स्वस्तात 108MP Camera देणार Samsung! Galaxy A73 ची डिजाइन आणि स्पेसिफिकेशन्स लीक
By सिद्धेश जाधव | Published: November 19, 2021 05:59 PM2021-11-19T17:59:11+5:302021-11-19T18:00:16+5:30
108MP Camera Phone Samsung Galaxy A73: Samsung Galaxy A73 ची डिजाइन लीक झाली आहे. हा स्मार्टफोन बजेट रेंजमध्ये 108MP रियर कॅमेऱ्यासह सादर केला जाईल.
Samsung Galaxy A73 ची डिजाइन लीक झाली आहे. हा फोन मिड बजेटमध्ये दोन स्टोरेज ऑप्शन्ससह सादर केला जाईल. ज्यात पंच-होल डिस्प्ले पॅनल आणि प्लास्टिक बॉडी देण्यात येईल. परंतु फोनमधील 108MP कॅमेऱ्यामुळे हा डिवाइस चर्चेत आला आहे. या मुख्य कॅमेऱ्याला अन्य तीन सेन्सरची जोड देण्यात येईल.
Samsung Galaxy A73 डिजाईन
LetsGoDigital ने आगामी Galaxy A73 चे CAD (Computer Aided Design) शेयर केली आहे. या रेंडर्समधून आगामी सॅमसंग फोनच्या डिजाईनची माहिती मिळाली आहे. त्यानुसार A73 मध्ये याआधी आलेल्या Galaxy A72 प्रमाणेच कॅमेरा मॉड्यूल मिळेल. फोनच्या बॅक पॅनलवर चार कॅमेरा सेन्सर दिसत आहेत. तर डावीकडील पॅनलवर वॉल्यूम आणि पॉवर बटन आहेत. तळाला मध्ये USB Type C, SIM कार्ड ट्रे आणि स्पिकर ग्रिल देण्यात आली आहे. विशेष म्हणजे या फोनमध्ये 3.5mm ऑडियो जॅक मात्र दिसत नाही.
Samsung Galaxy A73 लीक स्पेसिफिकेशन्स
Samsung Galaxy A73 चे काही स्पेक्स सप्टेंबरमध्ये लीक झाले होते. त्यानुसार हा फोन 108MP च्या प्रायमरी सेन्सरसह बाजारात येऊ शकतो. स्वस्त Galaxy A सीरीजमधील हा पहिलाच डिवाइस असेल, ज्यात 108MP चा कॅमेरा मिळेल. फक्त मोठा सेन्सर नव्हे तर त्यासोबत OIS (ऑप्टिकल इमेज स्टेब्लाइजेशन) फीचर देखील कंपनी देऊ शकते. प्रोसेसिंगसाठी Galaxy A73 मध्ये Qualcomm Snapdragon 750G प्रोसेसर मिळू शकतो. तसेच हा डिवाइस Android 12 वर आधारित OneUI 4.0 वर चालेल.