जगातील सर्वात मोठ्या फोन कॅमेरा सेन्सरसह Samsung चा 5G स्मार्टफोन लाँच; इतकी आहे किंमत 

By सिद्धेश जाधव | Published: March 19, 2022 11:58 AM2022-03-19T11:58:34+5:302022-03-19T14:12:45+5:30

Samsung Galaxy A73 5G स्मार्टफोन जागतिक बाजारात सादर करण्यात आला आहे. हा डिवाइस प्रीमियम मिड-रेंज सेगमेंटमध्ये दाखल होऊ शकतो.  

Samsung Galaxy A73 5G Launched With 108MP Camera 5000mah Battery Snapdragon 778G Processor  | जगातील सर्वात मोठ्या फोन कॅमेरा सेन्सरसह Samsung चा 5G स्मार्टफोन लाँच; इतकी आहे किंमत 

जगातील सर्वात मोठ्या फोन कॅमेरा सेन्सरसह Samsung चा 5G स्मार्टफोन लाँच; इतकी आहे किंमत 

Next

सॅमसंगनं आपल्या मिड-रेंज ‘ए’ सीरीजमध्ये Samsung Galaxy A73 5G स्मार्टफोन सादर केला आहे. या सीरिजमध्ये पहिल्यांदाच 108MP चा कॅमेरा देण्यात आला आहे, जो जगातील सर्वाधिक रिजोल्यूशन असलेला फोन कॅमेरा सेन्सर आहे. त्याचबरोबर या डिवाइसमध्ये Qualcomm Snapdragon 778G प्रोसेसर, 8GB RAM, 32MP चा सेल्फी कॅमेरा आणि 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे.  

Samsung Galaxy A73 5G चे स्पेसिफिकेशन्स  

Samsung Galaxy A73 5G मध्ये 6.7-इंचाचा फुलएचडी+ सुपर अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. हा पंच होल डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट, 2400 x 1080 पिक्सल रिजोल्यूशन आणि Corning Gorilla Glass 5 सह येतो. यात Snapdragon 778G ची प्रोसेसिंग पवार आणि Adreno 642L GPU मिळतो. सोबत 8GB पर्यंत RAM आणि 256GB पर्यंतची स्टोरेज आहे. जी मायक्रो SD कार्डच्या मदतीनं 1TB पर्यंत वाढवता येते. हा फोन Android 12 बेस्ड OneUI 4.1 वर चालतो.  

Samsung Galaxy A73 च्या बॅक पॅनलवर क्वॉड कॅमेरा सेटअप आहे. ज्यात 108MP चा मुख्य सेन्सर, 12MP ची अल्ट्रावाईड अँगल लेन्स, 5MP ची मॅक्रो लेन्स आणि 5MP चा डेप्थ सेन्सर आहे. तर फ्रंटला एक 32MP चा सेल्फी कॅमेरा मिळतो. बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्ससह या फोनमध्ये इन-डिस्प्ले सेन्सर देण्यात आला आहे. पाणी आणि धुळीपासून वाचण्यासाठी IP67 रेटिंग देण्यात आली आहे. हा सॅमसंग फोनमध्ये 25W चार्जिंग सपोर्टसह 5000mAh बॅटरी मिळते. या फोनच्या किंमतीची किंवा भारतीय लाँचची माहिती कंपनीनं दिली नाही. परंतु हा फोन 45 हजार रुपयांच्या आत सादर केला जाऊ शकतो, अशी माहिती मीडिया रिपोर्ट्समधून समोर आली आहे.  

Web Title: Samsung Galaxy A73 5G Launched With 108MP Camera 5000mah Battery Snapdragon 778G Processor 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.