सॅमसंगच्या A सीरिजमध्ये मिळू शकतो 108MP कॅमेरा; Samsung Galaxy A73 चा स्पेसिफिकेशन्स लीक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2021 12:37 PM2021-09-17T12:37:11+5:302021-09-17T12:37:19+5:30
Samsung Galaxy A73 स्मार्टफोन ‘A’ सीरिजमधील पहिला फोन असेल जो 108MP च्या मुख्य सेन्सरसह सादर केला जाऊ शकतो.
Samsung च्या ‘ए’ सीरिजमधील Galaxy A52s 5G स्मार्टफोन काही दिवसांपूर्वी भारतात सादर करण्यात आला होता. आता या सीरिजमधील आगामी स्मार्टफोन्सची माहिती समोर येऊ लागली आहे. एका रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे कि, कंपनी पुढल्या वर्षी Galaxy A Series लाइनअपमध्ये OIS सपोर्ट देण्याची योजना बनवत आहे. तसेच Galaxy A73 हा फोन कंपनीच्या A सीरीजमधील पहिला स्मार्टफोन असेल जो 108MP च्या कॅमेऱ्याला सपोर्ट करेल.
Samsung Galaxy A73 स्मार्टफोन 108 मेगापिक्सलच्या मुख्य कॅमेरा असलेल्या कॅमेरा सेटअपसह सादर केला होऊ शकतो. हा सेन्सर आतापर्यंत कंपनीच्या फ्लॅगशिप सीरिजमध्ये बघायला मिळाला आहे. ए सीरिजमधील Galaxy A72 मध्ये 64 मेगापिक्सलचा कॅमेरा कंपनीने दिला होता. त्यामुळे नवीन सेन्सर नक्कीच एका अपग्रेडचे काम करेल. मीडिया रिपोर्ट्सनुसार कंपनी Galaxy A73 स्मार्टफोन 2022 च्या पूर्वार्धात सादर करू शकते.
Samsung Galaxy A73 चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स
या आगामी फोनच्या स्पेसीफाकेशन्सची अजूनतरी कोणतीही ठोस माहिती समोर आली नाही. परंतु सीरिजचा इतिहास पाहता यात Snapdragon 7-series चा चिपसेट दिला जाऊ शकतो. तसेच यात 8GB RAM सह 128GB इंटरनल स्टोरेज दिली जाऊ शकते. Galaxy A72 प्रमाणेच Samsung Galaxy A73 मध्ये देखील AMOLED डिस्प्ले मिळू शकतो, ज्याचा रिफ्रेश रेट जास्त असेल. यात फास्ट चार्जिंगला सपोर्टसह मोठी बॅटरी मिळेल. हा फोन Android 12 OS बेस्ड सॅमसंग वनयुआयवर चालेल. आगामी काळात लिक्स आणि रिपोर्ट्समधून Galaxy A73 च्या इतर स्पेसिफिकेशन्सची माहिती समोर येईलच.