सॅमसंगचे ड्युअल सेल्फी कॅमेरायुक्त स्मार्टफोन्स
By शेखर पाटील | Published: December 21, 2017 02:21 PM2017-12-21T14:21:47+5:302017-12-21T15:46:21+5:30
सॅमसंग कंपनीने सॅमसंग गॅलेक्सी ए८ (२०१८) आणि गॅलेक्सी ए८ प्लस (२०१८) हे ड्युअल सेल्फी कॅमेर्यांनी सज्ज असणारे स्मार्टफोन्स जागतिक बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे.
सॅमसंग कंपनीने सॅमसंग गॅलेक्सी ए८ (२०१८) आणि गॅलेक्सी ए८ प्लस (२०१८) हे ड्युअल सेल्फी कॅमेर्यांनी सज्ज असणारे स्मार्टफोन्स जागतिक बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे.
सॅमसंग कंपनीने २०१५ साली गॅलेक्सी ए८ हे मॉडेल ग्राहकांना सादर केले होते. आता याची पुढील आवृत्ती गॅलेक्सी ए८ (२०१८) आणि गॅलेक्सी ए८ प्लस (२०१८) या मॉडेल्सच्या माध्यमातून सादर करण्यात येणार आहे. वर नमूद केल्यानुसार यातील सर्वात लक्षणीय फिचर म्हणजे ड्युअल फ्रंट कॅमेरा सेटअप होय. यातील एक कॅमेरा फिक्स्ड फोकस आणि एफ/१.९ अपार्चरयुक्त आहे. तर दुसरा ८ मेगापिक्सल्सयुक्त कॅमेरादेखील एफ/१.९ अपार्चरयुक्त दिलेला आहे. या दोन्ही कॅमेर्यांच्या मदतीने अतिशय उत्तम दर्जाच्या सेल्फी प्रतिमा घेता येत असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. यात बोके इफेक्टची सुविधा प्रदान करण्यात आली आहे. याच्या मदतीने कोणत्याही सेल्फी प्रतिमेचा पार्श्वभाग ब्लर करता येईल. तर याच्या अगदी विरूध्द म्हणजे अतिशय स्पष्ट आणि फोकस्ड पार्श्वभाग करण्याची सुविधाही यात असेल. या फ्रंट कॅमेर्यांमध्ये लाईव्ह फोकस हे फिचर इनबिल्ट अवस्थेत दिलेले आहे. याच्या मदतीने बोके इफेक्ट अधिक उत्तम प्रकारे अॅडजस्ट करता येणार आहे. तर या दोन्ही स्मार्टफोन्सच्या मागील बाजूस एफ/१.७ अपार्चरयुक्त १६ मेगापिक्सल्सचा मुख्य कॅमेरा देण्यात आला आहे. यात व्हिडीओ डिजीटल इमेज स्टॅबिलायझेशन म्हणजे व्हीडीआयएस हे विशेष फिचर असेल. यात हायपरलॅप्स आणि फूड मोड आदींच्या माध्यमातून प्रतिमा काढता येतील.
उर्वरित फिचर्सचा विचार केला असता, सॅमसंग गॅलेक्सी ए८ (२०१८) या मॉडेलमध्ये ५.६ इंच आकारमानाचा आणि २२२० बाय १०८० पिक्सल्स म्हणजेच फुल एचडी प्लस या क्षमतेचा सुपर अमोलेड डिस्प्ले असेल. तर गॅलेक्सी ए८ प्लस (२०१८) या स्मार्टफोनमध्ये याच क्षमतेचा मात्र ६ इंच आकारमानाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. सॅमसंग गॅलेक्सी ए८ (२०१८) मॉडेलची रॅम ४ जीबी तर गॅलेक्सी ए८ प्लस (२०१८) या मॉडेलमध्ये चार व सहा जीबी रॅमचे पर्याय दिले आहेत. दोन्हींमध्ये ३२/६४ जीबी स्टोअरेजचे पर्याय असून मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने याला २५६ जीबीपर्यंत वाढविता येणार आहे. तर या दोन्ही स्मार्टफोन्समध्ये अनुक्रमे ३,००० आणि ३,५०० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी देण्यात आलेली आहे. हे दोन्ही मॉडेल्स अँड्रॉइडच्या नोगट या आवृत्तीवर चालणारे असून डस्टप्रूफ व वॉटरप्रूफ आहेत. पुढील महिन्यात हे मॉडेल्स विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सॅमसंग कंपनीने जाहीर केले आहे. मात्र याचे मूल्य सांगण्यात आलेले नाही.