४ रिअर कॅमेरे असलेला Samsung Galaxy A9 लवकरच होऊ शकतो लॉन्च!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2018 04:55 PM2018-10-05T16:55:46+5:302018-10-05T16:55:51+5:30
सॅमसंगने नुकताच आपला ट्रिपल कॅमेरा सेटअप असलेला पहिला स्मार्टफोन लॉन्च केलाय. आता कंपनी लवकरच चार रिअर कॅमेरे असलेला स्मार्टफोन लॉन्च करण्याची योजना आखत असल्याची चर्चा आहे.
(Image: AllAboutSamsung)
सॅमसंगने नुकताच आपला ट्रिपल कॅमेरा सेटअप असलेला पहिला स्मार्टफोन लॉन्च केलाय. आता कंपनी लवकरच चार रिअर कॅमेरे असलेला स्मार्टफोन लॉन्च करण्याची योजना आखत असल्याची चर्चा आहे. सॅमसंगने नुकतीच घोषणा केली की, ११ ऑक्टोबरला कंपनी एक गॅलक्सी इव्हेंटचं आयोजन करणार आहे. या इव्हेंटमध्ये Samsung Galaxy A9 लॉन्च केला जाऊ शकतो.
या इव्हेंटमध्ये नवीन फोन लॉन्च केला जाण्याची शक्यता आहे. कंपनी व्दारे या इव्हेंटमध्ये Samsung Galaxy A9 किंवा Galaxy Star 9 प्रो लॉन्च केले जाऊ शकतात. या स्मार्टफोनमध्ये चार रिअर कॅमेरे असू शकतात. एका जर्मन ब्लॉग AllAboutSamsung ने सॅमसंगच्या नव्या फोनचा फोटो जारी केलाय. बघायला तर हा एक ऑफिशिअल फोटो वाटतो. तसेच या फोनचे स्पेसिफिकेशनचाही खुलासा केला आहे.
Samsung Galaxy A9 मध्ये ६.२८ इंचाची एचडी प्लस सुपर एमोलेड डिस्प्ले असू शकतो. या फोनमध्ये अॅन्ड्रॉईड ८.० ऑपरेटिंग सिस्टम असण्याची अपेक्षा आहे. तसेच फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ६६० प्रोसेसर दिलं जाऊ शकता. त्यासोबतच फोनमध्ये ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी इनबिल्ट स्टोरेज दिलं जाऊ शकतं. यूजर्स हे स्टोरेज ५१२ जीबीपर्यत वाढवू शकतात.
लिक झालेल्या स्पेसिफिकेशन्सनुसार, Samsung Galaxy A9 मध्ये चार रिअर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. डिवाइसमध्ये अॅपर्चर एफ/१.७ सोबतच २४ मेगापिक्सल प्रायमरी सेंसर, अॅपर्चर एफ/२.२ आणि लाइव्ह फोकससोबत ५ मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर, अॅपर्चर एफ/२.४ सोबत ८ मेगापिक्सल वाइड-अॅंगल लेंस सेंसर आणि अॅपर्चर एफ/२.४ सोबत १० मेगापिक्सलचे सेंसर असू शकतात.
स्मार्टफोनमध्ये ऑटोफोकससोबत ८ मेगापिक्सल सेल्फी शूटर असू शकतं. स्मार्टफोनच्या रिअरला फिंगरप्रिंट सेंसर आणि फेशिअल रिकग्निशन टेक्नॉलॉजी असू शकते. स्मार्टफोनला पॉवरसाठी क्विक चार्ज २.० सपोर्टसोबत 3720mAh बॅटरी असू शकते.