Samsung चा फोन वापरताय? मग ही बातमी वाचाच; आपोआप ऑन-ऑफ होत आहेत हे 6 फोन
By सिद्धेश जाधव | Published: September 21, 2021 05:08 PM2021-09-21T17:08:09+5:302021-09-21T17:08:32+5:30
Samsung Phones Auto Restart Problem: Samsung Galaxy A आणि Samsung Galaxy M सीरीजमधील सॅमसंग फोन आपोआप Reboot म्हणजे ऑन-ऑफ होत आहेत.
भारतीय स्मार्टफोन ग्राहकांचा Samsung वर खूप जास्त विश्वास आहे. फक्त एक जुनी कंपनी म्हणून नये तर नॉन चायनीज कंपनी म्हणून लोक सॅमसंगच्या फोन्सना पहिली पसंती देतात. बऱ्याचदा कमी किंमतीत Xiaomi-Realme सारख्या कंपन्या चांगले फीचर्स देत असताना भारतीय सॅमसंग फोन्सची निवड करतात. परंतु सध्या भारतात Samsung Galaxy A आणि Samsung Galaxy M सीरीजमधील अनेक स्मार्टफोन्समधील दोष बातम्यांमधून समोर येऊ लागला आहे. या सीरिजमधील सॅमसंग फोन आपोआप Reboot म्हणजे ऑन-ऑफ होत आहेत.
सॅमसंग स्मार्टफोन्समधील या समस्येची माहिती प्रसिद्ध टेक वेबसाईट गिजमोचायनाने दिली आहे. वेबसाईटच्या रिपोर्टनुसार, भारतात अनेक सॅमसंग मोबाईल युजर्सचे डिवाइस अचानक रिबूट होत आहेत. आपोआप बंद चालू होण्याची ही समस्या सॅमसंग गॅलेक्सी ए आणि गॅलेक्सी एम सीरीजमधील स्मार्टफोन्समध्ये सर्वाधिक आढळली आहे. कंपनीने याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
सॅमसंग गॅलेक्सी ए आणि गॅलेक्सी एम सीरीजच्या युजर्सनी त्यांचे फोन अचानक फ्रिज आणि हँग होऊन बंद होत असल्याची तक्रार केली आहे. हे फोन पूर्णपणे बंद न होता चालू बंद होत आहेत, ज्याला बूटलूप देखील म्हणतात. सुरवातीला हा दोष मदरबोर्डमध्ये असेल असे सांगण्यात आले होते, परंतु आता युजर्सची संख्या वाढतच आहे.
सॅमसंग गॅलेक्सी ‘ए’ सीरीजमधील Samsung Galaxy A50, Samsung Galaxy A50s आणि Samsung Galaxy A51 स्मार्टफोन तसेच गॅलेक्सी ‘एम’ सीरीजमधील Samsung Galaxy M30s, Samsung Galaxy M31 आणि Samsung Galaxy M31s स्मार्टफोनच्या युजर्सना ही समस्या भेडसावत आहे.