सॅमसंगचा अफलातून लॅपटॉप, सिमकार्ड टाकता येणार; वायफायचे टेन्शनच मिटले...
By सिद्धेश जाधव | Published: June 3, 2021 02:31 PM2021-06-03T14:31:25+5:302021-06-03T14:32:19+5:30
Samsung Galaxy Book Go Launch: सॅमसंग गॅलेक्सी बुक गो वाय-फाय आणि LTE (मोबाईल नेटवर्क) अश्या दोन व्हेरिएंटमध्ये सादर केला गेला आहे.
Galaxy Book सिरीजमध्ये तीन नवीन लॅपटॉप सादर केल्यानंतर आता Samsung इलेक्ट्रॉनिक्सने Samsung Galaxy Book Go सादर केला आहे. हा लॅपटॉप 4G आणि 5G वेरिएंटमध्ये लॉन्च केला गेला आहे. या लॅपटॉपचे वजन खूप कमी आहे तसेच हा स्लिम देखील आहे. चला जाणून घेऊया या नवीन लॅपटॉपची किंमत तसेच इतर फीचर्सबाबत.
Samsung Galaxy Book Go ची किंमत
सॅमसंग गॅलेक्सी बुक गो वाय-फाय आणि LTE (मोबाईल नेटवर्क) अश्या दोन व्हेरिएंटमध्ये सादर केला गेला आहे. वाय-फाय वेरिएंटची किंमत 349 यूएसडी आहे जी भारतीय चलनात अंदाजे 25,484 रुपये आहे. या लॅपॉटपच्या LTE व्हेरिएंटची किंमत मात्र कंपनीने अद्याप सांगितलेली नाही. काही निवडक देशांमध्ये हा लॅपटॉप या महिन्यात उपलब्ध होईल, त्यानंतर लवकरच हा जगभरात खरेदीसाठी उपलब्ध होईल.
Samsung Galaxy Book Go चे स्पेसिफिकेशन्स
Galaxy Book Go 14.9 मिमी पातळ आहे आणि या लॅपटॉपचे वजन जवळपास 1.38 किलोग्राम आहे. हा लॅपटॉप Apple मॅक बुकसारखा दिसतो. कंपनीने हा फक्त सिल्वर कलर शेडमध्ये सादर केला आहे. तसेच, लॅपटॉपमध्ये 14 इंचाचा आयपीएस एलसीडी डिस्प्ले देण्यात आले आहे. हा एचडी रिजोल्यूशन असलेला डिस्प्ले आहे. गॅलेक्सी बुक गोमध्ये विंडोज 10 ऑपरेटिंग सिस्टम देण्यात आली आहे. हा लॅपटॉप क्वालकॉमच्या नव्या कोऱ्या स्नॅपड्रॅगॉन 7c Gen 2 प्रोसेसरवर चालतो. यात 4GB RAM + 64GB स्टोरेज आणि 8GB RAM + 128GB स्टोरेज असे दोन पर्याय उपलब्ध आहेत. स्टोरेज वाढवण्यासाठी माइक्रोएसडी कार्ड स्लॉट देण्यात आला आहे.
गॅलेक्सी बुक गो मध्ये व्हिडीओ कॉलिंगसाठी 720p वेब कॅमेरा देण्यात आला आहे. डॉल्बी ऑडियोला सपोर्ट असलेला एक स्टीरियो स्पीकर आहे. कनेक्टिविटीसाठी या लॅपटॉपमध्ये एक यूएसबी 2.0 टाइप-ए पोर्ट, दोन यूएसबी 3.2 टाइप-सी पोर्ट, एक नॅनो सिम कार्ड स्लॉट, 3.4 मिमी ऑडियो जॅक, वाय-फाय 5, आणि ब्लूटूथ 5.1 सह असे फीचर्स देण्यात आले आहेत. यात 42.3Whr ची बॅटरी आहे, जी 25W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.