भयंकर! कानात इअरबड्सचा स्फोट; तरुणी झाली कायमची बहिरी, नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2024 03:05 PM2024-09-26T15:05:43+5:302024-09-26T15:07:39+5:30

कानामध्येच इअरबडसचा स्फोट झाल्याने महिलेची ऐकण्याची क्षमता गेली आहे. ती कायमची बहिरी झाली.

samsung galaxy buds fe blasts in woman ear causes permanent hearing loss tukriye | भयंकर! कानात इअरबड्सचा स्फोट; तरुणी झाली कायमची बहिरी, नेमकं काय घडलं?

भयंकर! कानात इअरबड्सचा स्फोट; तरुणी झाली कायमची बहिरी, नेमकं काय घडलं?

सॅमसंगच्या TWS इअरबड्सचा स्फोट झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कानामध्येच इअरबडसचा स्फोट झाल्याने महिलेची ऐकण्याची क्षमता गेली आहे. ती कायमची बहिरी झाली. या घटनेमुळे संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे. बयाजित नावाच्या विद्यार्थ्याकडे Samsung S24 Ultra फोन होता. त्याच्यासोबत वापरण्यासाठी त्याने सॅमसंग इअरबड्स विकत घेतले. 

अनबॉक्सिंगनंतर त्याने इअरबड्स चार्ज केले नाही. कारण इयरबड्समध्ये सुमारे ३६% बॅटरी होती. नवीन इअरबड्स असल्याने त्याची गर्लफ्रेंड जास्तच उत्साहित होती, तिने ते कानात घातले, त्यानंतर त्याचा वापर करत असतानाच तिच्या कानात एका इअरबडचा स्फोट झाला. ज्यामुळे तिची ऐकण्याची क्षमता कायमची डॅमेज झाली.

विद्यार्थ्याकडे डॉक्टरांचा एक रिपोर्ट आहे जो इअरबडमधील स्फोटामुळे दुखापत झाल्याची पुष्टी करतो. तक्रारीनंतर सॅमसंगने नवीन इअरबड्स देण्याची ऑफर दिली आहे पण सुरक्षेबाबत काहीही सांगितलं नाही. सॅमसंगने या संपूर्ण प्रकरणावर अद्याप कोणतेही अधिकृत विधान जारी केलेले नाही.

रिपोर्टनुसार, जेव्हा हा तरुण स्फोट झालेले इअरबड्स घेऊन पहिल्यांदा सर्व्हिस सेंटरमध्ये गेला तेव्हा त्याची अवस्था पाहून सर्व्हिस सेंटरचे कर्मचारी माफी मागताना दिसले. दोन दिवसांच्या तपासानंतर, त्यांनी निष्कर्ष काढला की, फक्त बड्स डॅमेज झाले आहेत. त्याचा कोणताही स्फोट झालेला नाही. सर्व्हिस सेंटरच्या कर्मचाऱ्यांनी इअरबड्सच्या मॉडल रिप्लेसमेंटची ऑफर दिली. 

करू नका 'ही' चूक 

आजकाल, बाजारात उपलब्ध असलेले बहुतेक इअरबड्स वॉटरप्रूफ असतात. स्मार्टफोन किंवा इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांप्रमाणे, इअरबडमध्ये लिथियम-आयन बॅटरीचा वापर केला जातो. इअरबड्समध्ये 35mAh पासून ते 50mAh पर्यंत बॅटरी दिली जाते.

अशा परिस्थितीत इअरबड्स वापरण्यापूर्वी बड्स गरम आहेत की नाही हे तपासून पाहावं. शॉर्ट सर्किटमुळे बड्समध्ये असं घडू शकतं. जर त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं लीकेज होत असेल तर त्यामध्ये शॉर्ट सर्किट होण्याची शक्यता असते.
 

Web Title: samsung galaxy buds fe blasts in woman ear causes permanent hearing loss tukriye

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.