सॅमसंग गॅलेक्सी सी 8 स्मार्टफोनची जागतिक बाजारपेठेत उतरण्याची घोषणा

By शेखर पाटील | Published: September 11, 2017 08:56 AM2017-09-11T08:56:39+5:302017-09-11T08:58:08+5:30

सॅमसंग कंपनीने आपला गॅलेक्सी सी ८ हा स्मार्टफोन जागतिक बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली असून यात ड्युअल कॅमेरा सेटअप प्रदान करण्यात आला आहे.

Samsung Galaxy C8 Smartphone announced on the global market | सॅमसंग गॅलेक्सी सी 8 स्मार्टफोनची जागतिक बाजारपेठेत उतरण्याची घोषणा

सॅमसंग गॅलेक्सी सी 8 स्मार्टफोनची जागतिक बाजारपेठेत उतरण्याची घोषणा

Next

सॅमसंग गॅलेक्सी सी ८ या मॉडेलमध्ये १३ आणि ५ मेगापिक्सल्स क्षमतांचे दोन कॅमेरे देण्यात आले आहेत. यातील पहिल्या कॅमेर्‍यात एफ/१.९ अपार्चर तर दुसर्‍यात एफ/१.७ अपार्चर देण्यात आलेले आहे. तर या मॉडेलमध्ये सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी एफ/१.९ अपार्चरसह तब्बल १६ मेगापिक्सल्सचा कॅमेरा असेल. सॅमसंग गॅलेक्सी सी ८ या मॉडेलमधील बॅटरी ३,००० मिलीअँपिअर क्षमतेची असेल. यात फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्टसह ब्ल्यू-टुथ, वाय-फाय, जीपीएस, मायक्रो-युएसबी आदी फिचर्स असतील. तर यात अ‍ॅक्सलेरोमीटर, गायरोस्कोप, ग्रॅव्हीटी, अँबिअंट लाईट सेन्सर्सदेखील प्रदान करण्यात आले आहेत. 

सॅमसंग गॅलेक्सी सी ८ या स्मार्टफोनमध्ये ५.५ इंच आकारमानाचा आणि १०८० बाय १९२० पिक्सल्स म्हणजेच फुल एचडी क्षमतेचा सुपर अमोलेड डिस्प्ले असेल. याचे तीन जीबी रॅम/३२ जीबी स्टोअरेज आणि ४ जीबी रॅम/६४ जीबी स्टोअरेज असे दोन व्हेरियंट बाजारपेठेत उतारण्यात येणार आहेत. या दोन्ही व्हेरियंटमध्ये मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने स्टोअरेज वाढविण्याची सुविधा देण्यात आलेली आहे. हा स्मार्टफोन ब्लॅक, गोल्ड आणि पिंक या तीन आकर्षक रंगांमध्ये ग्राहकांना उपलब्ध करण्यात येणार असल्याचे सॅमसंग कंपनीने स्पष्ट केले आहे. मात्र याच्या विविध व्हेरियंटचे मूल्य अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. लवकरच हे मॉडेल भारतीय ग्राहकांना सादर करण्यात येईल असे मानले जात आहे.

Web Title: Samsung Galaxy C8 Smartphone announced on the global market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.