मोठी बॅटरी असलेल स्वस्त फोन हवा? थांबा, 6000mAh बॅटरीसह पुढील आठवड्यात येतोय Galaxy F13
By सिद्धेश जाधव | Published: June 17, 2022 03:04 PM2022-06-17T15:04:42+5:302022-06-17T15:04:57+5:30
Samsung Galaxy F13 फोन की भारतात लाँचिंग डेट का खुलासा झाला आहे. इसे कंपनी 22 जूनला लाँच करने वाली आहे. फोनमध्ये 6000mAh बॅटरी के साथ-साथ अन्य अनेक शानदार फीचर्स मिळतील.
Samsung Galaxy F13 च्या लाँच डेटची माहिती समोर आली आहे. हा हँडसेट पुढील आठवड्यात ग्राहकांच्या भेटीला येईल. ई-कॉमर्स वेबसाईट Flipkart वर याचं पेज लाईव्ह करण्यात आलं आहे. याआधी आलेल्या टीजरमधून फोनच्या महत्वाच्या स्पेसिफिकेशनचा खुलासा झाला होता. फ्लिपकार्टनुसार, Samsung Galaxy F Series चा हा आगामी स्मार्टफोन भारतात 22 जून, 2022 रोजी दुपारी 12 वाजता लाँच करण्यात येईल. Flipkart वर एक पेज देखील लाईव्ह करण्यात आलं आहे.
Samsung Galaxy F13 चे स्पेसिफिकेशन्स
Samsung Galaxy F13 मध्ये Full HD+ IPS डिस्प्ले मिळेल. फ्लिपकार्ट लिस्टिंगनुसार हा स्मार्टफोन 15W फास्ट चार्जिंगसह बाजारात येईल, फोनमध्ये 6000mAh ची मोठी बॅटरी मिळेल. पोस्टरमध्ये 8GB पर्यंत RAM चा उल्लेख देखील आहे, त्यासोबत व्हर्च्युअल RAM देखील मिळेल.
डिवाइसमध्ये ऑटो डेटा स्विचिंग नावाचं नवीन फिचर मिळेल. त्यामुळे चांगल्या कनेक्टिव्हिटीसाठी आपोआप दुसऱ्या सिमच्या डेटवर स्विच करण्यात येईल. असं फिचर पहिल्यांदाच या सेगमेंटमध्ये पाहायला मिळेल. फोन ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह बाजारात दाखल होईल. ज्यांची माहिती मिळाली नाही परंतु ग्रीन, ब्लू आणि रोज गोल्ड या कलर व्हेरिएंटचा खुलासा झाला आहे.
Geekbench नुसार, फोनमध्ये Exynos 850 प्रोसेसर दिला जाऊ शकतो. हा Android 12 बेस्ड OneUI 4.0 वर चालेल. यात 3.5mm चा आहेडफोन जॅक मिळण्याची शक्यता आहे, यात साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर मिळेल.