रेडमी-रियलमीच्या मुळावर बसणार Samsung चा ‘हा’ घाव; बजेट सेगमेंटमध्ये Galaxy F13 होऊ शकतो लाँच 

By सिद्धेश जाधव | Published: April 4, 2022 03:52 PM2022-04-04T15:52:45+5:302022-04-04T15:53:22+5:30

Samsung Galaxy F13 नावाचा स्मार्टफोन बेंचमार्किंग साईट गिकबेंचवर लिस्ट झाला आहे.  

Samsung Galaxy F13 Listed On Geekbench With 4GB RAM Launch Soon  | रेडमी-रियलमीच्या मुळावर बसणार Samsung चा ‘हा’ घाव; बजेट सेगमेंटमध्ये Galaxy F13 होऊ शकतो लाँच 

रेडमी-रियलमीच्या मुळावर बसणार Samsung चा ‘हा’ घाव; बजेट सेगमेंटमध्ये Galaxy F13 होऊ शकतो लाँच 

Next

Samsung ने काही दिवसांपूर्वी 5 नवीन स्मार्टफोन भारतात लाँच केले आहेत. हे फोन्स विविध बजेट सेगमेंटमध्ये रेडमी आणि रियलमीला टक्कर देत आहेत. परंतु लो बजेट सेगमेंट जिथे या कंपन्यांचा दबदबा आहे तिथे कोणताच सॅमसंग डिवाइस दिसत नाही. आता बातमी आली आहे की, सॅमसंग नवीन लो बजेट डिवाइसच्या तयारीला लागली आहे. कंपनीचा Samsung Galaxy F13 नावाचा स्मार्टफोन बेंचमार्किंग साईट गिकबेंचवर लिस्ट झाला आहे.  

गिकबेंच ही एक बेंचमार्किंग साईट आहे जिथे स्मार्टफोनसह अनेक डिवाइस लाँच होण्याआधी लिस्ट केले जातात. तिथे Samsung Galaxy F13 स्मार्टफोन samsung SM-E135F मॉडेल नंबरसह लिस्ट करण्यात आला आहे. या लिस्टिंगमधून फोनचे बेंचमार्किंग स्कोर तर समजला आहेत सोबत काही महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती मिळाली आहे. सॅमसंग गॅलेक्सी एफ13 ला गिकबेंचच्या सिंगल-कोर टेस्टमध्ये 157 आणि मल्टी-कोर टेस्टमध्ये 587 पॉईंट्स मिळाले आहेत.  

Samsung Galaxy F13 चे लीक स्पेसिफिकेशन्स  

गीकबेंचनुसार, सॅमसंग गॅलेक्सी एफ13 स्मार्टफोन अँड्रॉइड 12 ऑपरेटिंग सिस्टम आधारित सॅमसंग वनयुआय 4 सह बाजारात येईल. यात 2.0गीगाहर्ट्ज पर्यंतचा क्लॉक स्पीड असलेला ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात येईल. सोबत सॅमसंगचा एक्सनॉस 850 चिपसेट असेल. हा फोनमध्ये 4 जीबी रॅम मिळेल. यापेक्षा जास्त स्पेसिफिकेशन्ससाठी आपल्याला आगामी लिक्सची वाट बघावी लागेल.  

काही दिवसांपूर्वी आलेल्या Samsung Galaxy A13 चे स्पेसिफिकेशन्स 

सॅमसंग गॅलेक्सी ए13 मध्ये 6.6 इंचाचा टीएफटी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन अँड्रॉइड 12 आधारित वनयुआय 4.1 वर चालतो. यात एक्सनॉस 850 चिपसेट देण्यात आला आहे. सोबत 4 जीबी रॅम व 64 जीबी स्टोरेज मिळते. फोनच्या मागे असलेल्या क्वॉड कॅमेरा सेटअपमध्ये 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 5 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स, 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आहे. फ्रंटला 8 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळतो. यात 15वॉट फास्ट चार्जिंगसह 5,000एमएएच बॅटरी मिळते. 

 

 

Web Title: Samsung Galaxy F13 Listed On Geekbench With 4GB RAM Launch Soon 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.