6,000mAh बॅटरी असलेल्या Samsung Galaxy F22 फोनचा पहिला सेल आज; मिळवा 1 हजार रुपयांची सूट
By सिद्धेश जाधव | Published: July 13, 2021 11:19 AM2021-07-13T11:19:22+5:302021-07-13T11:24:24+5:30
Samsung Galaxy F22 Sale:Samsung Galaxy F22 स्मार्टफोन आजपासून भारतात विक्रीसाठी उपलब्ध होईल. हा नवीन सॅमसंग स्मार्टफोन 12,499 रुपयांमध्ये लाँच केला गेला आहे.
Samsung Galaxy F22 चा पहिला सेल आज आयोजित केला जाणार आहे. गॅलेक्सी एफ22 मध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप आणि सेल्फीसाठी वाटरड्रॉप नॉच डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच या फोनमध्ये 6,000 एमएएचची बॅटरी, 6 जीबी रॅम आणि 90 हर्ट्ज रिफ्रेश रेट देण्यात आला आहे.
Samsung Galaxy F22 ची किंमत आणि ऑफर्स
Samsung Galaxy F22 च्या 4GB रॅम + 64 GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 12,499 रुपये आहे. तर 6GB रॅम + 128 GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 14,499 रुपये ठेवण्यात आली आहे. हा फोन आज दुपारी 12 वाजल्यापासून Flipkart आणि Samsung India च्या ऑनलाइन स्टोरवरून विकत घेता येईल.
Flipkart वर सॅमसंग गॅलेक्सी एफ22 स्मार्टफोनच्या प्रीपेड ट्रांसजेक्शनवर 1,000 रुपयांची सूट दिली जात आहे. त्याचबरोबर तुम्ही एक्सचेंज आणि ईएमआयचा वापर करून देखील हा फोन विकत घेऊ शकता.
Samsung Galaxy F22 चे स्पेसिफिकेशन्स
सॅमसंग गॅलेक्सी एफ22 मध्ये 6.4-इंचाचा सुपर अॅमोलेड डिस्प्ले 90हर्ट्ज रिफ्रेश रेटसह देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 20:9 अस्पेक्ट रेशियो आणि 720 x 1600 पिक्सल रिजोल्यूशनसह येतो. हा सॅमसंग स्मार्टफोन अँड्रॉइड 11 ओएसवर चालतो. प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये MediaTek Helio G80 चिपसेट देण्यात आला आहे.
Samsung Galaxy F22 फोटोग्राफीसाठी क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या मागे एलईडी फ्लॅशसह 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेन्सर, 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड अँगल सेन्सर, 2 मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. या सॅमसंग फोनमध्ये 13 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. Samsung Galaxy F22 मध्ये पावर बॅकअपसाठी 6,000एमएएचची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 15वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.