Samsung चा नवीन स्वस्त फोन आला समोर; Galaxy F22 झाला लाँचपूर्वीच वेबसाइटवर लिस्ट 

By सिद्धेश जाधव | Published: June 16, 2021 04:16 PM2021-06-16T16:16:11+5:302021-06-16T16:18:17+5:30

Samsung Galaxy F22 listing: Galaxy F22 Bluetooth सर्टिफिकेशन वेबसाइटवर दिसला आहे, त्यामुळे स्पष्ट झाले आहे कि, Galaxy A22 आणि Galaxy F22 दोन्ही एकसारखे डिवाइस असतील.

Samsung galaxy f22 listed bluetooth certification rebranded version of galaxy a22  | Samsung चा नवीन स्वस्त फोन आला समोर; Galaxy F22 झाला लाँचपूर्वीच वेबसाइटवर लिस्ट 

Samsung चा नवीन स्वस्त फोन आला समोर; Galaxy F22 झाला लाँचपूर्वीच वेबसाइटवर लिस्ट 

Next

Samsung Galaxy F22 स्मार्टफोनशी निगडित माहिती समोर आली आहे. हा फोन Samsung Galaxy A22 किंवा Galaxy A22 5G चा रिब्रँडेड व्हर्जन असेल, अशी चर्चा आहे. आता Galaxy F22 Bluetooth सर्टिफिकेशन वेबसाइटवर दिसला आहे, त्यामुळे स्पष्ट झाले आहे कि, Galaxy A22 आणि Galaxy F22 दोन्ही एकसारखे डिवाइस असतील.  (Galaxy F22 spotted on Bluetooth certification listing) 

Samsung Galaxy F22 

सॅमसंगने काही दिवसांपूर्वी टेक मंचावर गॅलेक्सी ए-सीरीजमध्ये आपला Galaxy A22 नावाचा स्मार्टफोन सादर केला होताहा फोन 4G आणि 5G व्हेरिएंटमध्ये बाजारात दाखल झाला होता. Galaxy A22 आणि Galaxy F22 चे स्पेसिफिकेशन्स एकसारखे असतील, अशी चर्चा आहे.  

Samsung Galaxy A22 चे स्पेसिफिकेशन्स 

Samsung Galaxy A22 4G मध्ये 6.4-इंचाचा AMOLED HD+ डिस्प्ले आहे, हा डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेटसह येतो. तर, गॅलेक्सी A22 5G मध्ये 6.6-इंचाचा IPS एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे जो 60Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. याती, 4G व्हेरिएंटमध्ये MediaTek Helio G80 SoC आणि 5G व्हेरिएंटमध्ये MediaTek Dimensity 700 5G SoC देण्यात आली आहे. 

फोटोग्राफीसाठी फोनच्या 4G व्हेरिएंटमधील क्वाड कॅमेरा सेटअपमध्ये 48 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा, 8 मेगापिक्सल अल्ट्रावाइड सेन्सर, दोन 2-मेगापिक्सलचे डेप्थ आणि मॅक्रो सेन्सर देण्यात आले आहेत. तसेच, फोनमध्ये 13 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. 

5G व्हेरिएंटमध्ये मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळतो. या सेटअपमध्ये 48 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा मिळतो. त्याचबरोबर, 5 मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड सेन्सर आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. फोनमध्ये व्हिडीओ कॉलिंग आणि सेल्फीसाठी 8 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. दोन्ही व्हेरिएंट 5,000एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतात. Galaxy F22 चे स्पेसिफिकेशन्स काहीसे असेच असतील.  

Web Title: Samsung galaxy f22 listed bluetooth certification rebranded version of galaxy a22 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.