Samsung Galaxy F22 जुलैमध्ये होणार भारतात लाँच; असे असतील या फोनचे फीचर्स
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2021 07:42 PM2021-06-29T19:42:37+5:302021-06-29T19:43:19+5:30
Samsung Galaxy F22 Launch: Samsung Galaxy F22 कंपनी जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात लाँच करू शकते.
गेला महिनाभर Samsung च्या गॅलेक्सी ‘एफ’ सीरीजमधील फोनची बातमी येत आहे. या सीरीजमध्ये Samsung Galaxy F22 स्मार्टफोन लाँच केला जाईल, असे अनेक लिक्समधून सांगण्यात आले आहे. काही दिवसांपूवी हा स्मार्टफोनसॅमसंग इंडियावर SM-E225F/DS मॉडेल नंबरसह लिस्ट करण्यात आला होता. आता 91mobiles ने माहिती दिली आहे कि Samsung Galaxy F22 जुलैमध्ये भारतात लाँच करण्यात येईल.
91mobiles इंडस्ट्री सोर्सच्या हवाल्याने सांगितले आहे कि Samsung Galaxy F22 कंपनी जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात लाँच करू शकते. या फोनची लाँच डेट कंपनीने अधिकृतपणे सांगितलेली नाही, परंतु रिपोर्ट्सनुसार हा स्मार्टफोन 5 जुलैनंतर कोणत्याही दिवशी भारतात दाखल होऊ शकतो.
Samsung Galaxy F22 ची किंमत
सॅमसंग गॅलेक्सी एफ22 स्मार्टफोनच्या किंमतीची कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. आतापर्यंत समोर आलेल्या रिपोर्ट्सनुसार हा एक लोवर मिड बजेट स्मार्टफोन असेल. त्यामुळे भारतात Samsung Galaxy F22 स्मार्टफोनची किंमत 15,000 रुपयांच्या आसपास असू शकते.
Samsung Galaxy F22 चे स्पेसिफिकेशन्स
Samsung Galaxy F22 मध्ये 6.4 इंचाचा एचडी+ सुपर अॅमोलेड डिस्प्ले देण्यात येईल. या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 90हर्ट्ज असेल. या फोनमध्ये 48MP क्वॉड रियर कॅमेरा आणि 6000mAh मोठी बॅटरी दिली जाऊ शकते. फोनच्या ठोस स्पेसिफिकेशन्स आणि किंमतीसाठी लाँचची वाट बघावी लागेल.