Samsung पुन्हा करणार बाजारपेठेवर कब्जा; 20 हजारांच्या बजेटमध्ये येतोय अॅडव्हान्स फीचर्स असलेला फोन
By सिद्धेश जाधव | Published: March 4, 2022 03:07 PM2022-03-04T15:07:49+5:302022-03-05T11:09:24+5:30
Samsung Galaxy F23 5G स्मार्टफोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट असलेले डिस्प्ले मिळेल. सोबत कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ची सुरक्षा असेल.
Samsung Galaxy F23 5G ची चर्चा गेले कित्येक दिवस टेक वर्तुळात सुरु आहे. हा फोन 8 मार्चला सॅमसंग भारतात लाँच करणार आहे. ई-कॉमर्स साइट Flipkart वर एक मायक्रोसाइट या मोबाईलसाठी लाईव्ह करण्यात आली आहे. या मायक्रो वेबसाईटनुसार, Galaxy F23 5G फोन बेजल लेस वॉटरड्रॉप नॉच डिस्प्लेसह बाजारात येईल. फोनच्या मागे उजव्या कोपऱ्यात व्हर्टिकली ट्रिपल कॅमेरा सेटअप फ्लॅश लाईटसह मिळेल. या फोनचे मिंट आणि डार्क ग्रीन कलर ऑप्शन वेबसाईटवर लिस्ट झाले आहेत.
Samsung Galaxy F23 5G चे स्पेसिफिकेशन्स
Flipkart च्या लिस्टिंगनुसार, यात 120Hz रिफ्रेश रेट असलेले डिस्प्ले मिळेल. सोबत कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ची सुरक्षा असेल. टीजरमधून ऑक्टाकोर Qualcomm Snapdragon 750G प्रोसेसरची माहिती मिळाली आहे. सोबत ग्राफिक्ससाठी Adreno Adreno 619 जीपीयू मिळेल.
Samsung Galaxy F23 5G चे संभाव्य स्पेक्स
रिपोर्ट्सनुसार, Galaxy F23 मध्ये Full HD+ रिजोल्यूशन असलेला डिस्प्ले मिळेल. हा अॅमोलेड किंवा एलसीडी पॅनल असेल हे स्पष्ट झालं नाही. सिक्योरिटीसाठी यात साइड फिंगरप्रिंट सेन्सर मिळेल. मागील ट्रिपल कॅमेरा स्तूप सेटअपमध्ये एलईडी फ्लॅशसह 50MP चा मुख्य कॅमेरा, 8MP सेकंडरी आणि 2MP चा थर्ड कॅमेरा मिळेल. Samsung Galaxy F23 ची किंमत 20000 रुपयांच्या आसपास असू शकते, अशी माहिती काही रिपोर्ट्समधून समोर आली आहे.
हे देखील वाचा:
- टीव्हीच्या खरेदीवर ‘बिग बचत’! 6 हजारांमध्ये 40-इंचाचा Smart TV, उरले फक्त 3 दिवस
- 15 हजारांच्या आत Motorola ची कमाल; जबरदस्त स्पेसिफिकेशन्ससह आला Moto G22
- तुमच्या अपेक्षेपेक्षा तुमची कितीतरी जास्त माहिती आहे अॅमेझॉनकडे, असा थांबवा ‘डेटा गेम’