Samsung च्या दमदार 5G Phone वर 3000 रुपयांची सवलत; फोनमध्ये 8GB RAM सह 64MP कॅमेरा
By सिद्धेश जाधव | Published: January 11, 2022 05:10 PM2022-01-11T17:10:58+5:302022-01-11T17:11:08+5:30
Samsung Galaxy F42 5G Phone: 64MP कॅमेरा, 8GB RAM आणि 5000mAh बॅटरी असलेला Samsung Galaxy F42 5G Phone फोन 3,000 रुपयांच्या सवलतीसह विकत घेता येईल.
Flipkart नं मोबाईल बोनांजा सेलची सुरुवात केली आहे. आज या सेलचा शेवटचा दिवस आहे. या सेलमध्ये अनेक स्मार्टफोन्सवर बम्पर डिस्काउंट दिला जात आहे. यात Samsung Galaxy F42 5G Phone चा देखील समावेश आहे. 64MP कॅमेरा, 8GB RAM आणि 5000mAh बॅटरी असलेला हा फोन 3000 रुपयांच्या सवलतीसह विकत घेता येईल.
Samsung Galaxy F42 5G Phone ची किंमत आणि ऑफर
Samsung Galaxy F42 5G चा 6 जीबी रॅम व्हेरिएंट सेल मध्ये 17,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल, ज्याची किंमत 20,999 रुपये आहे. तसेच 8 जीबी रॅम असलेल्या 22,999 रुपयांच्या व्हेरिएंटवर 3000 रुपयांची बचत करता येईल. या डिस्काउंटसाठी तुम्हाला हा फोन डेबिट व क्रेडिट कार्डच्या माध्यमातून विकत घ्यावा लागेल. कॅश ऑन डिलिव्हरी पर्याय निवडल्यास ही सूट मिळणार नाही.
Samsung Galaxy F42 5G चे स्पेसिफिकेशन्स
Samsung Galaxy F42 5G स्मार्टफोनमध्ये 6.6 इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. 1080 x 2408 पिक्सल रिजोल्यूशन आणि 90Hz रिफ्रेश रेट असलेला हा एक टीएफटी पॅनल आहे. या फोनमध्ये कंपनीने मीडियाटेकचा डायमेनसिटी 700 चिपसेट देण्यात आला आहे. ग्राफिक्ससाठी हा सॅमसंग फोन माली जी57 जीपीयूला सपोर्ट करतो. हा 5G फोन अँड्रॉइड 11 ओएससह वनयुआयवर चालतो.
या लेटेस्ट सॅमसंग फोनमध्ये 8GB पर्यंतचा RAM आणि 128GB स्टोरेज देण्यात आली आहे. ही स्टोरेज मायक्रोएसडी कार्डने वाढवता येते. या स्मार्टफोनचा कॅमेरा सेगमेंट पाहता, याच्या बॅक पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळतो. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 64 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर, 5 मेगापिक्सलची अल्ट्रावाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर मिळतो. या फोनच्या फ्रंट पॅनलवर 8 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.
Samsung Galaxy Wide5 5G मध्ये सिक्योरिटीसाठी साईड माऊंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक फिचर देखील देण्यात आले आहे. हा एक ड्युअल सिम फोन आहे जो बेसिक कनेक्टिविटी फीचर्सला सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी या सॅमसंग फोनमध्ये 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे जी 15वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
हे देखील वाचा:
28 हजारांत iPhone तर 7 हजारांत अँड्रॉइड; 10 स्मार्टफोनवर मिळतायत ढासू ऑफर