Samsung Galaxy F62 ची २२ फेब्रुवारीपासून होणार विक्री; पाहा कसा मिळवाल १२,५०० रूपयांचा फायदा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2021 03:04 PM2021-02-20T15:04:26+5:302021-02-20T15:08:04+5:30

Samsung Galaxy F62 : २२ फेब्रुवारीपासून सुरू होणार या स्मार्टफोनची विक्री

Samsung Galaxy F62 to go on sale from February 22; See how the benefit will be up to Rs. 12,500 | Samsung Galaxy F62 ची २२ फेब्रुवारीपासून होणार विक्री; पाहा कसा मिळवाल १२,५०० रूपयांचा फायदा

Samsung Galaxy F62 ची २२ फेब्रुवारीपासून होणार विक्री; पाहा कसा मिळवाल १२,५०० रूपयांचा फायदा

Next
ठळक मुद्दे22 फेब्रुवारीपासून सुरू होणार या स्मार्टफोनची विक्रीया स्मार्टफोनवर मिळणार 12,500 रूपयांपर्यंतचा फायदा

Samsung नं नुकताच आपला स्मार्टफोन Samsung Galaxy F62 लाँच केला. परंतु या स्मार्टफोनची विक्री 22 फेब्रुवारीपासून होणार आहे. ग्राहकांना हा स्मार्टफोन फ्लिपकार्ट आणि सॅमसंगच्या ऑनलाईन स्टोअरवरूनही घेता येणार आहे. तसंच ग्राहकांना हा स्मार्टफोन ऑफलाईन पद्धतीनंही घेता येईल. Reliance Digital आणि My Jio स्टोअरमधूनही हा स्मार्टफोन ग्राहकांना विकत घेता येईल. या स्मार्टफोनची सुरूवातीची किंमत 23,999 रूपये इतकी आहे. परंतु ग्राहकांना यावर 12,500 रूपयांपर्यंतचाही फायदा मिळू शकतो. 

Samsung Galaxy F62 हा स्मार्टफोन दोन व्हेरिअंटमध्ये उपलब्ध आहे. याच्या 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज मॉडेलची किंमत 23,999 रूपये इतकी आहे. तसंच 8GB रॅम + 128GB स्टोरेज असलेल्या मॉडेलची किंमत 25,999 रूपये आहे. ICICI बँकेच्या क्रेडिट कार्ड धारकांना या स्मार्टफोनवर 2,500 रूपयांचा इन्स्टन्ट डिस्काऊंट देण्यात येत आहे. तसंच रिलायन्स जिओच्या Samsung Galaxy F62 स्मार्टफोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना 10 हजार रूपयांपर्यंतचे अतिरिक्त बेनिफिट्स मिळणार आहे. अशाप्रकारे या स्मार्टफोनवर 12,500 रूपयांचा फायदा घेता येऊ शकतो. 

काय आहेत फीचर्स?

या स्मार्टफोनमध्ये FHD+ सुपर अॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. तसंच यात Exynos 9825 या प्रोसेसरचा वापर करण्यात आला आहे. या स्मार्टफोनचं स्टोरेज मायक्रोएसडी कार्डसह 1TB पर्यंत वाढवता येऊ शकतं. तसंच हा स्मार्टफोन अँड्रॉईड 11 वर आधारित One UI 3.1 वर काम करतो. या फोनचं वजन 218 ग्राम आहे. 

या स्मार्टफोनचं सर्वात महत्त्वाचं फीचर म्हणजे यामध्ये 7000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन 25W फास्ट चार्जिंग सपोर्ट करत असून तो युएसबी टाईप सी पोर्टसह येतो. यामध्ये फोटोग्राफीसाठी क्वाड रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. तसंच या प्रायमरी सेन्सर 64 मेगापिक्सेलचा आहे. याव्यतिरिक्त याच 12 मेगापिक्सेलचा अल्ट्रा व्हाईड कॅमेरा, 5 मेगापिक्सेलचा मायक्रो आमि 5 मेगापिक्सेलचा डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. याव्यतिरिक्त सेल्फीसाठी 32 मेगापिक्सेलचाही कॅमेरा यात देण्यात आला आहे. 
 

Web Title: Samsung Galaxy F62 to go on sale from February 22; See how the benefit will be up to Rs. 12,500

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.