4,000 रुपयांनी स्वस्त झाला 7000mAh बॅटरी असलेला सॅमसंग स्मार्टफोन; या किंमतीत मिळणार Galaxy F62  

By सिद्धेश जाधव | Published: August 5, 2021 06:07 PM2021-08-05T18:07:47+5:302021-08-05T18:09:08+5:30

Samsung Galaxy F62 Price: सॅमसंगने गॅलेक्सी एफ62 ची किंमत थेट 4,000 रुपयांनी कमी केली आहे. फ्लिपकार्टवर सुरु असलेल्या सेलमध्ये या स्मार्टफोन 2,000 रुपयांचा अतिरिक्त डिस्काउंट देखील मिळत आहे.

Samsung Galaxy F62 receive permanent Price Cut of rs 4000 In India  | 4,000 रुपयांनी स्वस्त झाला 7000mAh बॅटरी असलेला सॅमसंग स्मार्टफोन; या किंमतीत मिळणार Galaxy F62  

4,000 रुपयांनी स्वस्त झाला 7000mAh बॅटरी असलेला सॅमसंग स्मार्टफोन; या किंमतीत मिळणार Galaxy F62  

Next

Samsung ने फेब्रुवारीमध्ये भारतात Samsung Galaxy F62 स्मार्टफोन लाँच केला होता. लाँचच्या वेळी या स्मार्टफोनची किंमत कंपनीने 23,999 रुपये ठेवली होती. आता आपल्या चाहत्यांना भेट देत सॅमसंगने गॅलेक्सी एफ62 ची किंमत थेट 4,000 रुपयांनी कमी केली आहे. ही कपात कायमस्वरूपी असल्यामुळे Samsung Galaxy F62 आता 19,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. विशेष म्हणजे फ्लिपकार्टवर सुरु असलेल्या सेलमध्ये या स्मार्टफोन 2,000 रुपयांचा अतिरिक्त डिस्काउंटसह 17,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.  

Samsung Galaxy F62 चे स्पेसिफिकेशन्स  

Samsung Galaxy F62 स्मार्टफोनमध्ये 6.7-इंचाचा फुल एचडी+ अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. ,सॅमसंगचा हा स्मार्टफोन कंपनीच्या फ्लॅगशिप चिपसेट Exynos 9825 सह सादर करण्यात आहे. या सॅमसंग स्मार्टफोनमध्ये 8GB पर्यंतच्या रॅम आणि 128GB स्टोरेजसह देण्यात आली आहे. ही स्टोरेज मायक्रोएसडी कार्डने 512GB पर्यंत वाढवता येते.  

Samsung Galaxy F62 स्मार्टफोनमध्ये क्वाड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या फोनचा मुख्य कॅमेरा 64 मेगापिक्सल आहे, सोबत 12 मेगापिक्सलची वाइड अँगल लेन्स , 5 मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर आणि 5 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स देण्यात आली आहे. या फोनमध्ये 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. Galaxy F62 मध्ये 7,000mAh ची दमदार बॅटरी आणि 25W फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. 

Web Title: Samsung Galaxy F62 receive permanent Price Cut of rs 4000 In India 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.