सॅमसंगने गॅलेक्सी जे 2 प्रो आणि गॅलेक्सी जे 2च्या किंमतीत केली घट
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2018 10:07 AM2018-02-22T10:07:35+5:302018-02-22T10:08:07+5:30
सॅमसंगने गॅलेक्सी जे 2 प्रो व गॅलेक्सी जे 2 (2017) या दोन स्मार्टफोनच्या किंमतीमध्ये मोठी कपात केली आहे.
मुंबई- सॅमसंगने गॅलेक्सी जे 2 प्रो व गॅलेक्सी जे 2 (2017) या दोन स्मार्टफोनच्या किंमतीमध्ये मोठी कपात केली आहे. आता सॅमसंगने गॅलेक्सी जे 2 प्रो 7 हजार 690 रूपयांना खरेदी करता येणार आहे. तर गॅलेक्सी जे 2 6 हजार 590 रूपयांना खरेदी करता येणार आहे. सॅमसंग गॅलेक्सी जे 2 प्रोच्या किंमत 2 हजार 200 रूपयांनी कमी करण्यात आली आहे तर गॅलेक्सी जे 2 ची किंमत 800 रूपयांनी कमी करण्यात आली आहे. मुंबईचे प्रसिद्ध रिटेलर महेश टेलीकॉमने ट्विट करून याबद्दलची माहिती दिली.
सॅमसंग जे 2 प्रो स्मार्टफोनला ५ इंच आकारमानाचा आणि ५४० बाय ९६० पिक्सल्स क्षमतेचा (क्युएचडी) सुपर अमोलेड या प्रकारातील डिस्प्ले देण्यात आला आहे. यात क्वॉड-कोअर प्रोसेसर प्रदान करण्यात आला आहे. याची रॅम १.५ जीबी तर इनबिल्ट स्टोअरेज १६ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने वाढविण्याची सुविधा प्रदान करण्यात आली आहे. एलईडी फ्लॅशसह यातील मुख्य कॅमेरा ८ मेगापिक्सल्सचा आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यात एफ/२.२ अपार्चरसह ५ मेगापिक्सल्सचा कॅमेरा असेल.
सॅमसंग गॅलेक्सी जे२ प्रो (२०१८) या मॉडेलमध्ये २६०० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी असून ती दीर्घ काळापर्यंत चालत असल्याचा कंपनीचा दावा आहे. तर हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या नोगट या आवृत्तीवर चालणारा असेल. या स्मार्टफोनमध्ये फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्टसह ब्ल्यू-टुथ, वाय-फाय, जीपीएस, मायक्रो-युएसबी आदी फिचर्स असतील. तर यात अॅक्सलेरोमीटर, गायरोस्कोप, ग्रॅव्हीटी, अँबिअंट लाईट सेन्सर्सदेखील प्रदान करण्यात आले आहेत.
सॅमसंग गॅलेक्सी जे2 (2017) चे फीचर्स- सॅमसंग गॅलेक्सी जे 2 (2017) मध्ये 4.7 इंच आकारमानाचा एचडी सुपर अमोलेड डिस्प्ले आहे. यामध्ये 1.3 गीगाहर्ड्ज क्वॉड-कोअर प्रोसेसर प्रदान करण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 1 जीबी रॅम असून 8 जीबी इंटरनल मेमरी आहे. फोनच्या इंटरनल मेमरीला मायक्रोएसडी कार्डने 128 जीबी पर्यंत वाढवता येईल. स्मार्टफोनमध्ये एलईडी फ्लॅशसह 5 मेगापिक्सल ऑटो फोकस कॅमेरा देण्यात आला आहे. तर सेल्फी व व्हिडीओ कॉलिंगसाठी सेल्फी 2 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. गुगलच्या एन्ड्रॉइड 6.0 मार्शमॅलोवर फोन चालतो. फोनमध्ये 4 जी एलटीई सपोर्ट असून 2 हजार मेगाहॅट्स बॅटरी आहे.