सॅमसंग गॅलेक्सी जे ७ प्राईम व जे ५ प्राईमच्या मूल्यात घट
By शेखर पाटील | Published: October 3, 2017 04:00 PM2017-10-03T16:00:00+5:302017-10-03T16:00:00+5:30
सॅमसंग कंपनीने आपल्या जे ७ प्राईम आणि जे ५ प्राईम या ३२ जीबी स्टोअरेज असणार्या दोन्ही स्मार्टफोनच्या मूल्यात दोन हजार रूपयांची कपात केली आहे.
सॅमसंग कंपनीने आपल्या जे ७ प्राईम आणि जे ५ प्राईम या ३२ जीबी स्टोअरेज असणार्या दोन्ही स्मार्टफोनच्या मूल्यात दोन हजार रूपयांची कपात केली आहे.
सॅमसंग कंपनीने मे महिन्यात ३२ जीबी स्टोअरेज असणारे सॅमसंग गॅलेक्सी जे ७ प्राईम व जे ५ प्राईम हे दोन मॉडेल्स १६,९०० आणि १४९०० रूपये मूल्यात लाँच केले होते. आता या दोन्ही मॉडेल्सचे मूल्य दोन हजार रूपयांनी कमी करण्यात आले आहेत. यामुळे हे स्मार्टफोन्स आता ग्राहकांना अनुक्रमे १४,९९० आणि १२,९९० रूपये मूल्यात खरेदी करता येणार आहे. या दोन्ही स्मार्टफोनमध्ये काही विशेष फिचर्स आहेत. यातील एस पॉवर प्लॅनिंगमुळे बॅटरीची क्षमता वाढविणे शक्य असून एस सिक्युअर या फिचरमुळे युजरला आपणास हवे ते अॅप्लीकेशन्स लपविणे/लॉक करणे शक्य आहे. याच्या मदतीने वाय-फाय सुरक्षित करता येते.
सॅमसंगच्या जे५ प्राईम या मॉडेलमध्ये पाच इंच आकाराचा आणि एचडी क्षमतेचा २.५ डी डिस्प्ले असून याची रॅम दोन जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ३२ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने वाढविण्याची सुविधा असेल. मार्शमॅलो आवृत्तीवर चालणार्या या मॉडेलमध्ये ३४०० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी तर १३ व ८ मेगापिक्सल्स क्षमतांचे कॅमेरे असतील. तर गॅलेक्सी जे ७ प्राईम या मॉडेलमध्ये ५.५ इंची फुल एचडी क्षमतेचा २.५ डी वक्राकार डिस्प्ले असून यावर कॉर्निंग गोरीला ग्लास ४ चे संरक्षक आवरण दिले आहे. याची रॅम तीन व स्टोअरेज ३२ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने २५६ जीबीपर्यंत वाढविणे शक्य आहे. यातील बॅटरी ३,३०० मिलीअँपिअर क्षमतेची असेल.