Samsung फॅन्सना झटका! दोन स्वस्त स्मार्टफोनच्या किंमतीत वाढ; जाणून घ्या नवीन किंमत  

By सिद्धेश जाधव | Published: September 8, 2021 12:30 PM2021-09-08T12:30:43+5:302021-09-08T12:33:35+5:30

Smartphone Price Hike: सॅमसंगचे बजेट स्मार्टफोन Galaxy M12 आणि Galaxy F12 च्य किंमतीत 500 रुपयांची वाढ केली आहे.

Samsung galaxy m12 and galaxy f12 price in india increased  | Samsung फॅन्सना झटका! दोन स्वस्त स्मार्टफोनच्या किंमतीत वाढ; जाणून घ्या नवीन किंमत  

Samsung फॅन्सना झटका! दोन स्वस्त स्मार्टफोनच्या किंमतीत वाढ; जाणून घ्या नवीन किंमत  

Next
ठळक मुद्देGalaxy M12 स्मार्टफोनचा 4GB RAM आणि 64GB स्टोरेज व्हेरिएंट आता 11,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल. Galaxy F12 स्मार्टफोनचा 4GB RAM आणि 64GB स्टोरेज मॉडेल आता 11,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

सॅमसंग इंडियाने आपल्या दोन बजेट स्मार्टफोनच्या किंमतीत वाढ केली आहे. कंपनीने बजेट स्मार्टफोन Galaxy M12 आणि Galaxy F12 च्या किंमतीत कायमस्वरूपी वाढ केली आहे. हे फोन्स नवीन किंमतीसह 7 सप्टेंबरपासून बाजारात उपलब्ध होतील. चला जाणून घेऊया Galaxy M12 आणि Galaxy F12 यांच्या सर्व व्हेरिएंटची नवीन किंमत.  

Samsung Galaxy M12 आणि Galaxy F12 ची नवीन किंमत 

सॅमसंगचे बजेट स्मार्टफोन Galaxy M12 आणि Galaxy F12 च्य किंमतीत 500 रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे Galaxy M12 स्मार्टफोनचा 4GB RAM आणि 64GB स्टोरेज व्हेरिएंट आता 11,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच Galaxy F12 स्मार्टफोनचा 4GB RAM आणि 64GB स्टोरेज मॉडेल आता 11,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तर या फोनच्या 4GB RAM आणि 128GB स्टोरेज मॉडेलसाठी आता 12499 रुपये मोजावे लागतील. 

Samsung Galaxy F12 चे स्पेसिफिकेशन्स 

Samsung Galaxy F12 स्मार्टफोनमध्ये 720 x 1600 पिक्सल रेज्ल्यूशन असलेला 6.5 इंचाचाचा एचडी+ टीएफटी एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 90हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि इनफिनिटी ‘व्ही’ डिजाईनसह बाजारात आला आहे. हा फोन अँड्रॉइड 11 ओएस आधारित वन युआय 3.1 वर चालतो. तसेच प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये सॅमसंगचा एक्सनॉस 850 चिपसेट देण्यात आला आहे. 

फोटोग्राफीसाठी सॅमसंग गॅलेक्सी एफ12 मध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात एलईडी फ्लॅशसह 48 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर, 5 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड सेन्सर, 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेन्सर आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर मिळतो. हा फोन 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. Samsung Galaxy F12 स्मार्टफोनमध्ये 6,000एमएएचची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. 

Web Title: Samsung galaxy m12 and galaxy f12 price in india increased 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.