Samsung Galaxy M13: सॅमसंगकडून 'करेक्ट कार्यक्रम'! 6000mAh बॅटरी अन् 50MP कॅमेरासह Galaxy M13 लॉन्च, किंमत फक्त... 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2022 03:45 PM2022-07-14T15:45:56+5:302022-07-14T15:46:28+5:30

Samsung Galaxy M13 4G आणि Samsung Galaxy M13 5G स्मार्टफोन आज भारतीय बाजारपेठेत लॉन्च करण्यात आला आहे. Samsung Galaxy M13 सीरिजच्या फोनची किंमत 11,999 रुपयांपासून सुरू होणार आहे. 

samsung galaxy m13 series launched in india price starts from rs 11999 here is all features | Samsung Galaxy M13: सॅमसंगकडून 'करेक्ट कार्यक्रम'! 6000mAh बॅटरी अन् 50MP कॅमेरासह Galaxy M13 लॉन्च, किंमत फक्त... 

Samsung Galaxy M13: सॅमसंगकडून 'करेक्ट कार्यक्रम'! 6000mAh बॅटरी अन् 50MP कॅमेरासह Galaxy M13 लॉन्च, किंमत फक्त... 

googlenewsNext

नवी दिल्ली-

Samsung Galaxy M13 स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत अखेर आज लॉन्च करण्यात आला आहे. कंपनीनं या स्मार्टफोनमध्ये खणखणीत फिचर्स देऊन प्रतिस्पर्धी ब्रँड्सचा 'करेक्ट कार्यक्रम' केला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण या स्मार्टफोनमध्ये देण्यात आलेले फिचर्स आणि क्षमता पाहता या फोननं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. Samsung Galaxy M13 सीरिजची किंमत 11,999 रुपयांपासून सुरू होत आहे. 

Samsung Galaxy M13 4G और Galaxy M13 5G ची कींमत
Samsung Galaxy M13 4G ची किंमत भारतात 11,999 रुपयांपासून सुरू होत आहे. या किमतीत तुम्हाला फोनमध्ये 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज मॉडल मिळणार आहे. या फोनच्या 6GB रॅम आणि 128GB स्टोरेजची क्षमता असलेल्या फोनची किंमत 13,999 रुपये इतकी आहे. 

Galaxy M13 5G ची किंमत 13,999 रुपयांपासून सुरू होते. या किमतीत फोनमध्ये तुम्हाला 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज मॉडल उपलब्ध आहे. तर याच्या दुसऱ्या मॉडेलमध्ये 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज असणार आहे. या फोनची किंमत 15,999 रुपये इतकी असणार आहे. हा स्मार्टफोन मिडनाइट ब्लू, एक्वा ग्रीन आणि स्टारडस्ट ब्राउन रंगाच्या पर्यायात उपलब्ध असणार आहे. 

Samsung Galaxy M13 4G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स 
Samsung Galaxy M13 4G मध्ये 6.6 इंचाची Full-HD+ स्क्रीन देण्यात आली आहे. यात Exynos 850 प्रोसेसर देण्यात आला आहे. यात 128GB स्टोरेज आणि 6GB रॅम देण्यात आली आहे. सॅमसंगनं यात व्हर्च्युअली पद्धतीनंही रॅम वाढविण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. हा फोन Android 12 वर काम करतो. 

यात 6,000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. तसंच हा फोन 15W फास्ट चार्जिंग सपोर्टसह उपलब्ध आहे. या फोनच्या रिअरमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. तसंच प्रायमरी कॅमेरा 50 मेगापिक्सलचा आहे. तसंच 5 मेगापिक्सेलचा अल्ट्रवाइड लेंस आणि एक-२ मेगापिक्सेलचा डेप्थ सेंसर देखील देण्यात आला आहे. फोनच्या समोरच्या बाजूला 8 मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला आहे. 

Web Title: samsung galaxy m13 series launched in india price starts from rs 11999 here is all features

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.