6000mAh बॅटरी असलेल्या Samsung स्मार्टफोनवर मिळतेय मोठी सवलत; फोनमध्ये 48MP चा कॅमेरा
By सिद्धेश जाधव | Updated: January 1, 2022 18:36 IST2022-01-01T18:33:54+5:302022-01-01T18:36:26+5:30
Samsung Galaxy M21 2021 Edition: Samsung Galaxy M21 2021 Edition चा 4 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटरनल स्टोरेज असलेला मॉडेल 12,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

6000mAh बॅटरी असलेल्या Samsung स्मार्टफोनवर मिळतेय मोठी सवलत; फोनमध्ये 48MP चा कॅमेरा
Samsung चा बजेट फ्रेंडली स्मार्टफोन Galaxy M21 2021 Edition अजून स्वस्त झाला आहे. अॅमेझॉन इंडियावर या फोनच्या खरेदीवर 1,000 रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे. ऑफर अंतर्गत या फोनचा 4 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटरनल स्टोरेज असलेला मॉडेल 12,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.
1 हजार रुपयांचा कॅशबॅक मिळवण्यासाठी तुम्हाला अॅक्सिस बँकेच्या क्रेडिट कार्डचा वापर करावा लागेल. तसेच जुना फोन एक्सचेंज करून तुम्ही आणखीन 12,300 रुपये वाचवू शकता. फोनच्या खरेदीवर कंपनी 6 महीने स्क्रीन रिप्लेसमेंट मोफत देत आहे.
Samsung Galaxy M21 2021 Edition चे स्पेसिफिकेशन
Samsung Galaxy M21 2021 Edition मध्ये 6.4-इंचाचा फुल एचडी+ सुपर अॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 19.5:9 अस्पेक्ट रेशियो आणि 1080 x 2340 पिक्सल रिजोल्यूशनला सपोर्ट करतो. या फोनमध्ये सॅमसंगचाच एक्सनॉस 9611 चिपसेट आणि माली जी72 जीपीयू आहे. हा सॅमसंग फोन अँड्रॉइड 11 आधारित सॅमसंग वन युआयवर चालतो.
Samsung Galaxy M21 2021 Edition मध्ये एलईडी फ्लॅशसह ट्रिपल रियर कॅमेरा मिळत आहे. यात 48-मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर देण्यात आला आहे. त्याचबरोबर 5-मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आणि 8-मेगापिक्सलची वाईड अँगल लेन्स देण्यात आली आहे. सेल्फी व व्हिडीओ कॉलिंगसाठी या सॅमसंग फोनमध्ये 20-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. पावर बॅकअपसाठी या फोनमध्ये 18वॉट फास्ट चार्जिंगसह 6,000एमएएचची बॅटरी मिळते.