6000mAh बॅटरी असलेल्या बजेट स्मार्टफोनच्या किंमतीत वाढ; आता इतक्या किंमतीत मिळणार Galaxy M21 2021 Edition
By सिद्धेश जाधव | Published: August 21, 2021 07:25 PM2021-08-21T19:25:30+5:302021-08-21T19:26:18+5:30
Galaxy M21 2021 Edition price: सॅमसंगने Galaxy M21 2021 Edition च्या दोन्ही व्हेरिएंटची किंमत 500 रुपयांनी वाढवली आहे.
Samsung ने गेल्याच महिन्यात भारतात एक नवीन लो बजेट स्मार्टफोन Samsung Galaxy M21 2021 Edition लाँच केला होता. या स्मार्टफोनची प्रारंभिक किंमत 12,499 रुपये ठेवण्यात आली होती. कंपनीने आता या स्मार्टफोनची किंमत वाढवली आहे. सॅमसंगने Galaxy M21 2021 Edition च्या दोन्ही व्हेरिएंटची किंमत 500 रुपयांनी वाढवली आहे. नवीन किंमत पुढील प्रमाणे आहे:
Samsung Galaxy M21 2021 Edition ची नवीन किंमत
4GB रॅम + 64GB स्टोरेज: 12,999 रुपये (जुनी किंमत: 12,499 रुपये)
6GB रॅम + 128GB स्टोरेज: 14,999 रुपये (जुनी किंमत 14,499 रुपये)
या किंमतीची माहिती 91mobiles ने ऑफलाइन स्टोरच्या माध्यमातून मिळवली आहे. परंतु अॅमेझॉन इंडियावर फोन नव्या किंमतीत विकला जात आहे. परंतु सॅमसंग स्टोरवर अजूनही जुनी किंमत दिसत आहे.
Samsung Galaxy M21 2021 Edition चे स्पेसिफिकेशन
Samsung Galaxy M21 2021 Edition मध्ये 6.4-इंचाचा फुल एचडी+ सुपर अॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 19.5:9 अस्पेक्ट रेशियो आणि 1080 x 2340 पिक्सल रिजोल्यूशनला सपोर्ट करतो. या फोनमध्ये सॅमसंगचाच एक्सनॉस 9611 चिपसेट आणि माली जी72 जीपीयू आहे. हा सॅमसंग फोन अँड्रॉइड 11 आधारित सॅमसंग वन युआयवर चालतो.
Samsung Galaxy M21 2021 Edition मध्ये एलईडी फ्लॅशसह ट्रिपल रियर कॅमेरा मिळत आहे. यात 48-मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर देण्यात आला आहे. त्याचबरोबर 5-मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आणि 8-मेगापिक्सलची वाईड अँगल लेन्स देण्यात आली आहे. सेल्फी व व्हिडीओ कॉलिंगसाठी या सॅमसंग फोनमध्ये 20-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. पावर बॅकअपसाठी या फोनमध्ये 18वॉट फास्ट चार्जिंगसह 6,000एमएएचची बॅटरी मिळते.