Samsung Galaxy M32 5G होऊ शकतो भारतात सादर; 6GB रॅमसह मिळणार 5G कनेक्टिव्हिटी
By सिद्धेश जाधव | Published: August 6, 2021 04:44 PM2021-08-06T16:44:22+5:302021-08-06T16:44:54+5:30
Samsung भारतात आपला नवीन 5G फोन सादर करण्याची तयारी करात आहे. कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर Samsung Galaxy M32 5G चा सपोर्ट पेज लाईव्ह करण्यात आला आहे.
Samsung Galaxy M32 5G भारतात लाँच होण्यासाठी सज्ज आहे. लवकरच या फोनच्या लाँच डेटची घोषणा कंपनी करू शकते. अलीकडेच Samsung India च्या वेबसाईटवर या 5G फोनचा सपोर्ट पेज लाईव्ह झाला आहे. सपोर्ट पेजवर लिस्ट झालेल्या फोनचा मॉडेल नंबर SM-M326B/DS आहे आणि हाच Samsung Galaxy M32 5G मॉडेल नंबर आहे. सपोर्ट पेज समोर आल्यामुळे हा फोन लवकरच भारतात लाँच केला जाईल, अशी अपेक्षा आहे. काही दिवसांपूर्वी या फोनला BIS सर्टिफिकेशन मिळाले होते. तसेच गिकबेंचच्या लिस्टिंगमधून या स्मार्टफोनच्या महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सचा खुलासा देखील झाला होता.
Samsung Galaxy M32 5G चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स
Samsung Galaxy M32 5G स्मार्टफोनच्या सपोर्ट पेजची माहिती सर्वप्रथम MySmartPrice ने दिली होती. या लिस्टिंगमध्ये हा फोन ड्युअल सिमला सपोर्ट करतो इतकेच सांगण्यात आले आहे. परंतु Geekbench लिस्टिंगनुसार फोनमध्ये MediaTek Dimensity 720 चिपसेट देण्यात आला आहे आणि यात 6GB रॅम मिळू शकते. इथे फक्त एकच रॅम व्हेरिएंट लिस्ट झाला असला तरी यापेक्षा जास्त मॉडेलमध्ये हा लाँच होण्याची अपेक्षा आहे. हा स्मार्टफोन Android 11 आधारित One UI वर चालतो.
सॅमसंग गॅलेक्सी M32 5G फोन Galaxy A32 5G चा रीब्रँडेड व्हर्जन असेल, अशी चर्चा आहे. Galaxy A32 5G स्मार्टफोन देखील Dimensity 720 चिपसेटसह आला आहे. या फोनमध्ये 6.5 इंचाचा एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. या सॅमसंग फोनमध्ये 48 मेगापिक्सलचा क्वाड रियर कॅमेरा सेटअप आहे. त्याचबरोबर 5000mAh ची बॅटरी 15W चार्जिंग सपोर्टसह देण्यात आली आहे. Galaxy M32 5G स्मार्टफोन भारतात Galaxy M42 5G पेक्षा कमी किंमतीती लाँच केला जाऊ शकतो.