एक दोन नव्हे तर 12 5G बँड्ससह Samsung Galaxy M32 5G आला भारतात; देणार का Xiaomi-Realme ला टक्कर
By सिद्धेश जाधव | Published: August 25, 2021 02:55 PM2021-08-25T14:55:52+5:302021-08-25T15:03:09+5:30
Samsung Galaxy M32 5G Price: Samsung Galaxy M32 5G स्मार्टफोनची किंमत 20,999 रुपये ठेवण्यात आली आहे. हा फोन 6GB RAM आणि 128GB इंटरनल स्टोरेजसह ब्लॅक आणि ब्लू रंगात सादर करण्यात आला आहे.
Samsung ने आज गॅलेक्सी ‘एम’ सीरीजचा नवीन स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. हा फोन जूनमध्ये सादर झालेल्या Galaxy M32 स्मार्टफोनचा 5G व्हेरिएंट आहे. भारतात हा फोन Samsung Galaxy M32 5G नावाने सादर करण्यात आला आहे. या फोनची किंमत 20,999 रुपये ठेवण्यात आली आहे. परंतु अॅमेझॉन या फोनवर डिस्काउंट देखील देत आहे. (Samsung Galaxy M32 5G launched in India at rs 20,999)
Samsung Galaxy M32 चे स्पेसिफिकेशन्स
Samsung Galaxy M32 5G स्मार्टफोनमध्ये 6.5 इंचाचा एचडी+ इनफिनिटी ‘व्ही’ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा एक 60 हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करणारा TFT डिस्प्ले आहे, जो Corning Gorilla Glass 5 प्रोटेक्शनसह येतो. हा अँड्रॉइड 11 ओएसवर आधारित OneUI 3.1 वर चालतो. या फोनमध्ये MediaTek Dimensity 720 चिपसेट देण्यात आला आहे. भारतात हा फोन 6GB RAM आणि 128GB स्टोरेजसह लाँच झाला आहे. या फोनची स्टोरेज मायक्रोएसडी कार्डने 1टीबी पर्यंत वाढवता येते.
सॅमसंगच्या या स्मार्टफोनमध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनच्या मागे एलईडी फ्लॅशसह 48 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, 8 मेगापिक्सलची अल्ट्रावाईड लेन्स, 5 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स देण्यात आली आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 13 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो.
कनेक्टिव्हिटीसाठी या फोनमध्ये 5G, 4G LTE, ड्युअल-बॅंड Wi-Fi, Bluetooth 5.1, GPS, USB Type-C port, आणि 3.5mm जॅक असे ऑप्शन देण्यात आले आहेत. या सॅमसंग स्मार्टफोनमध्ये 5,000एमएएचची मोठी बॅटरी देण्यात आली आहे.
Samsung Galaxy M32 5G किंमत
Samsung Galaxy M32 5G स्मार्टफोनची किंमत 20,999 रुपये ठेवण्यात आली आहे. हा फोन 6GB RAM आणि 128GB इंटरनल स्टोरेजसह ब्लॅक आणि ब्लू रंगात सादर करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन 2 सप्टेंबरपासून अॅमेझॉन आणि सॅमसंगच्या वेबसाइटवर खरेदीसाठी उपलब्ध होईल. पहिल्या सेल दरम्यान ICICI बँकेच्या क्रेडिट कार्डवर ग्राहकांना 2,000 रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट मिळेल.