25 ऑगस्टला येणार सॅमसंगचा स्वस्त 5G स्मार्टफोन; अॅमेझॉनवरून होणार Samsung Galaxy M32 ची विक्री
By सिद्धेश जाधव | Published: August 19, 2021 03:04 PM2021-08-19T15:04:02+5:302021-08-19T15:04:13+5:30
Samsung Galaxy M32 5G: आगामी Samsung Galaxy M32 स्मार्टफोन अॅमेझॉन इंडियावर लिस्ट करण्यात आला आहे. गॅलेक्सी A32 5G प्रमाणे या स्मार्टफोनमध्ये देखील मीडियाटेकची Dimensity 720 SoC दिली जाऊ शकते.
कालच सॅमसंगने आपला बजेट स्मार्टफोन Galaxy A03s भारतात सादर केला होता. हा स्मार्टफोन 5000mAh बॅटरी आणि मीडियाटेकचा हीलियो पी35 चिपसेटसह सादर करण्यात आला आहे. या सॅमसंग फोनची प्रारंभिक किंमत 11,499 रुपये ठेवण्यात आली आहे. आज Samsung च्या आगामी 5G फोनची बातमी समोर आली आहे. कंपनी आपला नवीन फोन Samsung Galaxy M32 5G नावाने 25 ऑगस्टला लाँच करणार आहे. ही माहिती सॅमसंगने दिली आहे, तसेच हा स्मार्टफोन अॅमेझॉन इंडियावर देखील लिस्ट करण्यात आला आहे.
Samsung Galaxy M32 5G चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स
Samsung Galaxy M32 5G चे स्पेक्स मोठ्या प्रमाणावर गॅलेक्सी A32 5G सारखे आहेत, त्यामुळे हा एक रीब्रँडेड स्मार्टफोन असू शकतो. या फोनमध्ये 16.5cm चा एचडी+ डिस्प्ले दिला जाऊ शकतो. गॅलेक्सी A32 5G प्रमाणे या स्मार्टफोनमध्ये देखील मीडियाटेकची Dimensity 720 SoC दिली जाऊ शकते. अॅमेझॉन इंडियानुसार हा Android 11-आधारित OneUI 3 वर चालेल.
Samsung Galaxy M32 5G मध्ये क्वॉड कॅमेरा सेटअप मिळू शकतो. यात मुख्य कॅमेरा 48MP चा असेल, त्याचबरोबर 8MP ची अल्ट्रावाईड लेन्स, 5MP चा मॅक्रो सेन्सर आणि 2MP चा डेप्थ सेन्सर दिला जाऊ शकतो. गॅलेक्सी ए32 प्रमाणे यात 13MP चा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो. या फोनमधील 5000 एमएएचची बॅटरी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करू शकते.