लाँच होण्याआधीच Samsung Galaxy M32 आला वेबसाइटवर; लवकरच येईल बाजारात  

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2021 12:29 PM2021-06-08T12:29:23+5:302021-06-08T12:30:26+5:30

Samsung Galaxy M32: FCC च्या डेटाबेसमध्ये Galaxy M32 SM-M325F मॉडेल नंबरसह दिसला आहे.

Samsung galaxy m32 appears on fcc launch date near   | लाँच होण्याआधीच Samsung Galaxy M32 आला वेबसाइटवर; लवकरच येईल बाजारात  

हा फोटो Samsung Galaxy M31 चा आहे.

Next

सॅमसंगच्या एम-सीरीज फोन गॅलेक्सी एम32 बद्दल कित्येक दिवसांपासून माहिती समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी सॅमसंग इंडियाच्या वेबसाइटवर सपोर्ट पेज दिसले होते, तर आता या फोनला फेडरल कम्युनिकेशन्स कमिशन (FCC) कडून मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे या महिन्यात हा फोन लाँच होईल, अशी चर्चा आहे. याआधी देखील हा डिवाइस Geekbench आणि ब्लूटूथ एसआईजीवर मॉडेल नंबर SM-M325FV/DS सह दिसला होता.  

Samsung Galaxy M32 चे FCC सर्टिफिकेशन 

MySmartprice ने दिलेल्या माहितीनुसार, FCC च्या डेटाबेसमध्ये Galaxy M32 SM-M325F मॉडेल नंबरसह दिसला आहे. लिस्टिंगवरून समजले आहे कि हँडसेट 15W रॅपिड चार्जिंग सपोर्टसह येईल. या लिस्टिंगमध्ये या स्पेसिफिकेशन्सव्यतिरिक्त इतर कोणतीही माहिती मिळाली नाही. 

परंतु, वारंवार नवीन सर्टिफिकेशनवर हा फोन दिसत असल्यामुळे हा फोन लवकरच बाजारात येईल, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. हा फोन गॅलेक्सी एम31 चा अपग्रेडेड वर्जन असेल.  

Samsung Galaxy M32 चे संभाव्य स्पेसिफिकेशन 

या 4जी फोनमध्ये अँड्रॉइड 11 ऑपरेटिंग सिस्टमसह लाँच केला जाईल. हा फोन 6जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज ऑप्शनमध्ये लाँच केला जाऊ शकतो. तसेच यात MediaTek Helio G80 प्रोसेसर मिळेल. फोनमध्ये 6.4 इंचाचा HD+ AMOLED डिस्प्ले, 48 मेगापिक्सलचा कॅमेरा आणि 6000 एमएएचची बॅटरी असू शकते. या फीचर्सची ठोस माहिती मिळाली नाही त्यामुळे जोपर्यंत फोन लाँच होत नाही तोपर्यंत आपल्याला फोन्सच्या स्पेसिफिकेशन्ससाठी वाट बघावी लागले.  

Web Title: Samsung galaxy m32 appears on fcc launch date near  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.