6,000mAh बॅटरी आणि 64MP कॅमेरा असलेला Galaxy M32 येत आहे भारतात, 21 जूनला होईल हा धमाकेदार फोन लाँच
By सिद्धेश जाधव | Published: June 14, 2021 12:24 PM2021-06-14T12:24:37+5:302021-06-14T12:25:45+5:30
Samsung Galaxy M32: Samsung Galaxy M32 अमेझॉनवर लिस्ट झाला असून 21 जूनला हा फोन भारतात लाँच केला जाईल.
सॅमसंग भारतात 21 जूनला आपल्या M-सीरीजचा Galaxy M32 हा फोन लाँच करेल, अशी माहिती अलीकडेच समोर आली होती. आता फोनच्या लाँच डेटची माहिती अमेझॉन इंडियाच्या माध्यमातून समोर आली आहे. अमेझॉनवरील माइक्रोसाइटमध्ये फोनच्या लाँचव्यतिरिक्त स्पेसिफिकेशन आणि डिजाइन देखील समजली आहे. (Samsung Galaxy M32 listed on Amazon India may launch on 21st June)
Samsun Galaxy M32 दुपारी 12 PM वाजता भारतात लाँच केला जाईल. लाँच झाल्यावर फोन Amazon India वर खरेदीसाठी उपलब्ध होईल. Galaxy M32 मध्ये यू-शेप नॉच देण्यात येईल. फोनच्या मागे चौरसाकृती क्वाड कॅमेरा सेटअप आणि एलईडी फ्लॅश असेल. फोनच्या उजव्या पॅनलवर पावर बटणमधेच फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे.
Samsung Galaxy M32 चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स
गॅलेक्सी M32 च्या अमेझॉन लिस्टिंगवरून समजले आहे कि, यात 6.4-इंचाची AMOLED स्क्रीन आहे जी FHD + रिजोल्यूशन आणि 90Hz रिफ्रेश रेटसह येईल. तसेच गॅलेक्सी M32 मध्ये 6,000mAh ची बॅटरी देण्यात येईल. या फोनमध्ये 20 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे आणि या फोनच्या मागील बाजूस 64 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा असेल.
ऑनलाईन रिपोर्ट्सनुसार, गॅलेक्सी एम32 मीडियाटेक हीलियो जी85 प्रोसेसरवर काम करेल. फोन 4GB RAM + 64GB आणि 6GB RAM + 128GB व्हेरिएंटमध्ये उपलब्ध होईल. तसेच, हा फोन वन युआयसह अँड्रॉइड 11 ओएसवर चालेल.