बाय बाय चिनी फोन्स! स्वस्त 5G Phone सेगमेंटमध्ये Samsung घेणार लीड, तीन नवीन स्मार्टफोन करणार भारतात एंट्री  

By सिद्धेश जाधव | Published: January 13, 2022 05:59 PM2022-01-13T17:59:39+5:302022-01-13T17:59:47+5:30

Samsung 5G Phones: Samsung लवकरच भारतात 3 5G स्मार्टफोन्स सादर करू शकते. हे स्मार्टफोन मिड रेंजमध्ये सादर केले जातील. यामुळे रेडमी, रियलमी आणि मोटोरोलाला टक्कर मिळू शकते.

Samsung galaxy m33 5g galaxy a33 5g and galaxy a53 5g phones listed on bis india launch soon  | बाय बाय चिनी फोन्स! स्वस्त 5G Phone सेगमेंटमध्ये Samsung घेणार लीड, तीन नवीन स्मार्टफोन करणार भारतात एंट्री  

बाय बाय चिनी फोन्स! स्वस्त 5G Phone सेगमेंटमध्ये Samsung घेणार लीड, तीन नवीन स्मार्टफोन करणार भारतात एंट्री  

googlenewsNext

Samsung लवकरच भारतातील आपल्या 5G Phones ची संख्या वाढवू शकते. याची सुरुवात कंपनी Galaxy M33, Galaxy A33 आणि Galaxy A53 हे तीन स्मार्टफोन्स सादर करून करू शकते. हे तीन डिवाइस आता ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड (BIS) वर लिस्ट करण्यात आले आहेत. ही लिस्टिंग MySmartPrice नं सर्वप्रथम स्पॉट केली आहे.  

सॅमसंगचे Galaxy M33, A33 आणि A53 स्मार्टफोनबद्दल BIS वर SM-M336BU/DS, SM-A336E/DS आणि SM-A536E/DS या मॉडेल नंबर्ससह लिस्ट करण्यात आले आहेत. यातील M33 स्मार्टफोन Exynos 1200 चिपसेटसह गिकबेंचवर दिसला आहे. तर A53 स्मार्टफोन काही ठिकाणी स्नॅपड्रॅगन चिपसेटसह येईल, असं सांगण्यात आलं आहे.  

Samsung Galaxy A33 5G स्मार्टफोनमध्ये 6.4-इंचाचा फुल एचडी+ सुपर अ‍ॅमोलेड डिस्प्ले मिळेल. स्मार्टफोनमध्ये MediaTek चा 5G प्रोसेसर देण्यात येईल. सोबत 6GB RAM देखील दिला जाऊ शकतो. या स्मार्टफोनमध्ये 5000mAh ची मोठी बॅटरी दिली जाऊ शकते. ही बॅटरी 15W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करू शकते.  

Samsung Galaxy A53 5G स्मार्टफोन 120Hz FHD+ AMOLED डिस्प्लेसह बाजारात येईल. यात 64MP चा प्रायमरी कॅमेरा मिळू शकतो. तर Galaxy M33 5G स्मार्टफोनमध्ये 6,000mAh ची बॅटरी 15W किंवा 25W फास्ट चार्जिंग सपोर्टसह दिली जाऊ शकते.  

हे देखील वाचा:

तुम्हाला ताप आहे कि नाही सांगणार स्मार्टवॉच; ब्लड प्रेशरची देखील घेणार काळजी, 8 दिवसांचा बॅटरी बॅकअप

PF मधील पैसे काढायचे आहेत का? UMANG App वर काही क्लिक्समध्ये होईल काम

Web Title: Samsung galaxy m33 5g galaxy a33 5g and galaxy a53 5g phones listed on bis india launch soon 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.