6000mAh च्या मोठ्या बॅटरीसह Samsung चा 5G Phone येणार बाजारात; लाँचपूर्वीच वेबसाईटवर झाला लिस्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2021 05:10 PM2021-12-14T17:10:30+5:302021-12-14T17:13:05+5:30
Samsung Galaxy M33 5G Phone: Samsung Galaxy M33 5G च्या बॅटरी क्षमतेची माहिती कोरियन वेबसाईटवरून मिळाली आहे. हा फोन 6000mAh बॅटरीसह बाजारात येणार आहे.
Samsung च्या लोकप्रिय Galaxy M सीरीजच्या आगामी स्मार्टफोनची माहिती मिळाली आहे. हा फोन बजेट सेगमेंटमध्ये सादर केला जाईल. तसेच याचे नाव Samsung Galaxy M33 5G असेल. याआधी देखील हा फोन Galaxy A33 5G च्या स्पेसिफिकेशन्ससह सादर केला जाईल, असं सांगण्यात आलं होतं. परंतु आता समोर आलेल्या बातमीमुळे हे दोन्ही फोन्स वेगवेगळ्या स्पेक्ससह ग्राहकांच्या भेटीला येतील, असं दिसतंय.
सॅमसंगच्या प्रत्येक हालचालीवर बारकाईनं लक्ष ठेवणाऱ्या SamMobile नं नव्या स्पेक्सचा खुलासा केला आहे. रिपोर्टनुसार, Galaxy M33 5G स्मार्टफोनमधील बॅटरीचा मॉडेल नंबर EB-BM336ABN आहे. ही बॅटरी Saftey Korea या सर्टिफिकेशन साईटवर लिस्ट करण्यात आली आहे. लिस्टिंगनुसार या बॅटरीची क्षमता 5,830mAh आहे म्हणजे हा स्मार्टफोन मार्केटिंगच्या भाषेत 6,000mAh बॅटरीसह बाजारात येईल.
फोनमधील फास्ट चार्जिंगची माहिती मात्र मिळाली नाही. रिपोर्टमध्ये हा फोन Android 12 आधारित वन युआय 4.0 सह बाजारात येईल. वेबसाईटनं सॅमसंग जानेवारी 2022 मध्ये आपला आगामी 5G फोन सादर करणार आहे, असं सांगितलं आहे.
आतापर्यंत Galaxy M33 5G स्मार्टफोन Galaxy A33 5G च्या स्पेक्ससह बाजारात येईल, असं सांगण्यात आलं होतं. परंतु Galaxy A33 5G मध्ये 5,000mAh च्या बॅटरीसह सादर केला जाऊ शकतो. त्यामुळे हे दोन्ही फोन्स वेगवेगळे असतील, हे स्पष्ट झालं आहे. या व्यतिरिक्त या आगामी 5G Phone च्या स्पेक्सची कोणतीही माहिती मिळाली नाही.
हे देखील वाचा:
3 हजार रुपयांच्या डिस्काउंटसह iQOO चा 5G Phone उपलब्ध; एकापेक्षा एक स्मार्टफोन्स मिळतायत स्वस्तात
Smartphone सर्विस सेंटरमध्ये देण्याआधी या 10 गोष्टींची काळजी नाही तर होऊ शकतं मोठं नुकसान