Samsung बदलणार गियर! 6000mAh बॅटरी आणि 6GB RAM सह येतोय परवडणारा 5G Phone
By सिद्धेश जाधव | Published: December 28, 2021 11:46 AM2021-12-28T11:46:21+5:302021-12-28T11:47:52+5:30
Samsung Galaxy M33 5G Phone: सॅमसंग गॅलेक्सी एम33 5जी स्मार्टफोन 6GB RAM सह लिस्ट झाला आहे. परंतु फोनचा 8GB RAM व्हेरिएंट देखील बाजारात येईल, अशी अपेक्षा आहे.
Samsung कंपनीआपल्या गॅलेक्सी ‘एम’ सीरीजच्या नव्या 5G Phone फोनवर काम करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार Samsung Galaxy M33 5G स्मार्टफोन मिडबजेट सेगमेंटमध्ये सादर केला जाईल. हा फोन कोरियन सर्टिफिकेशन्स साईटवर लिस्ट झाला होता. या लिस्टिंगमधून फोनच्या बॅटरीचा खुलासा झाला होता. आता हा फोन काही महत्वाच्या स्पेसिफिकेशन्ससह बेंचमार्किंग साईट गीकबेंचवर देखील लिस्ट झाला आहे.
गिकबेंचवर Galaxy M33 5G स्मार्टफोन Samsung SM-M336BU या मॉडेल नंबरसह लिस्ट करण्यात आला आहे. या लिस्टिंगमधून फक्त गॅलेक्सी एम33 5जी च्या स्पेसिफिकेशन्सची माहिती समोर आली नाही तर हा डिवाइस लवकरच ग्राहकांच्या भेटीला येणार हे निश्चित झालं आहे.
Samsung Galaxy M33 5G चे स्पेक्स
सॅमसंग गॅलेक्सी एम33 5जी स्मार्टफोन 6GB RAM सह लिस्ट झाला आहे. परंतु फोनचा 8GB RAM व्हेरिएंट देखील बाजारात येईल, अशी अपेक्षा आहे. फोन सॅमसंगच्या एक्सनॉस 1200 चिपसेटसह बाजारात येईल, ज्याला 2.40गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसरची जोड देण्यात येईल. हा फोन गीकबेंचवर लेटेस्ट अँड्रॉइड 12 ओएससह लिस्ट झाला आहे. Samsung Galaxy M33 5G ला गिकबेंचच्या सिंगल-कोर टेस्टमध्ये 726 आणि मल्टी-कोर टेस्टमध्ये 1830 पॉईंट्स मिळाले आहेत.
याआधी आलेल्या लिक्सनुसार, हा फोन 6.5 इंचाच्या फुलएचडी+ वॉटरड्रॉप नॉच डिस्प्लेसह बाजारात येईल. कंपनी हा फोन आयपी67 डस्ट आणि वॉटर रेजिस्टन्ससह बाजारात आणेल. 64MP + 8MP + 5MP + 2MP चा क्वॉड रियर कॅमेरा सेटअप मिळू शकतो. तसेच Samsung Galaxy M33 5G मध्ये 13MP चा फ्रंट कॅमेरा मिळेल.
हे देखील वाचा:
कॉल, चार्जिंग करताना स्मार्टफोन गरम होतो का? या टिप्स ठेवतील तुमचा फोन कूल
खुशखबर! iPhone स्वस्तात विकत घेण्याची सुवर्णसंधी; Apple प्रोडक्ट्सवर जबरदस्त डिस्काउंट