सिक्रेट माहिती लीक! भारतात लाँच होण्याआधीच Samsung Galaxy M33 5G चे स्पेक्सही आले समोर
By सिद्धेश जाधव | Published: March 31, 2022 07:05 PM2022-03-31T19:05:19+5:302022-03-31T19:05:57+5:30
Samsung Galaxy M33 5G भारतात 2 एप्रिलला लाँच केला जाणार आहे. परंतु त्याआधीच 6000mAh बॅटरी असलेल्या स्मार्टफोनची किंमत समजली आहे.
Samsung Galaxy M33 5G स्मार्टफोन भारतात 2 एप्रिलला लाँच होणार आहे. काही दिवसांपूर्वी या स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स समोर आले होते. त्यानुसार हा स्मार्टफोन 6000mAh च्या बॅटरीसह भारतात लाँच होईल. आता तर या स्मार्टफोनच्या किंमत, डिस्काउंट ऑफर्स आणि उपलब्धतेची माहिती देखील लीक झाली आहे.
टिप्सटर योगेश ब्रारनं दिलेल्या माहितीनुसार, Samsung Galaxy M33 5G स्मार्टफोनचे दोन व्हेरिएंट भारतीयांच्या भेटला येतील. यातील 6GB RAM आणि 128GB स्टोरेज मॉडेलची किंमत 21,999 रुपये असेल. तर 8GB RAM आणि 128GB स्टोरेज मॉडेलसाठी 23,999 रुपये मोजावे लागतील. तसेच हा फोन पुढील आठवड्यात सेलसाठी उपलब्ध होईल आणि यावर 2,000 रुपये पर्यंतचा डिस्काउंट देखील कंपनी देऊ शकते.
Samsung Galaxy M33 5G चे स्पेसिफिकेशन्स
सॅमसंग गॅलेक्सी एम33 5जी मध्ये 5nm ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात येईल. या स्मार्टफोनचे दोन व्हेरिएंट येणार आहेत. ज्यात 6GB रॅम व 128GB आणि 8GB रॅम व 128GB मॉडेल्सचा समावेश आहे. मायक्रो साईटवरून Samsung Galaxy M33 5G च्या 6000mAh बॅटरीची माहिती मिळाली आहे, जी 25W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल.
लिक्सनुसार, Samsung Galaxy M33 5G स्मार्टफोनमध्ये 6.6 इंचाचा फुलएचडी+ एलसीडी डिस्प्ले देण्यात येईल. हा डिस्प्ले 1080x2408 पिक्सल रिजोल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. हा फोन Android 12 बेस्ड One UI 4.1 वर चालेल.
या फोनमध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप मिळेल. ज्यात 50-मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 5-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाईड अँगल सेन्सर, 2-मेगापिक्सलचा मॅक्रो आणि 2-मेगापिक्सलचा डेप्थ कॅमेरा मिळेल. फ्रंटला 8-मेगापिक्सलचा सेन्सर असेल. बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्ससह कंपनी यात साईड फिंगरप्रिंट सेन्सर मिळेल.