तयार राहा! 6000mAh ची बॅटरी आणि 8GB रॅमसह येतोय Samsung चा जबरदस्त स्मार्टफोन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2022 05:43 PM2022-03-26T17:43:43+5:302022-03-26T17:43:55+5:30
मायक्रो साईटवरून Samsung Galaxy M33 5G च्या 6000mAh बॅटरीची माहिती मिळाली आहे, जी 25W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल.
Samsung Galaxy M33 5G स्मार्टफोनच्या भारतीय लाँचची तारीख अधिकृतपणे समोर आली आहे. हा स्मार्टफोन येत्या 2 एप्रिलला दुपारी 12 वाजता भारतीयांच्या भेटीला येईल, अशी माहिती अॅमेझॉनवरील एका मायक्रोसाइटच्या माध्यमातून मिळाली आहे. सहाजिकच आहे की या फोनची विक्री देखील अॅमेझॉन इंडियाच्या माध्यमातून केली जाईल. या मायक्रोसाईटवर काही स्पेक्सचा देखील खुलासा केला गेला आहे, परंतु किंमत मात्र समजली नाही.
Samsung Galaxy M33 5G चे स्पेसिफिकेशन्स
सॅमसंग गॅलेक्सी एम33 5जी मध्ये 5nm ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात येईल. या स्मार्टफोनचे दोन व्हेरिएंट येणार आहेत. ज्यात 6GB रॅम व 128GB आणि 8GB रॅम व 128GB मॉडेल्सचा समावेश आहे. मायक्रो साईटवरून Samsung Galaxy M33 5G च्या 6000mAh बॅटरीची माहिती मिळाली आहे, जी 25W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल.
लिक्सनुसार, Samsung Galaxy M33 5G स्मार्टफोनमध्ये 6.6 इंचाचा फुलएचडी+ एलसीडी डिस्प्ले देण्यात येईल. हा डिस्प्ले 1080x2408 पिक्सल रिजोल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. हा फोन Android 12 बेस्ड One UI 4.1 वर चालेल. या फोनमध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप मिळेल. ज्यात 50-मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 5-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाईड अँगल सेन्सर, 2-मेगापिक्सलचा मॅक्रो आणि 2-मेगापिक्सलचा डेप्थ कॅमेरा मिळेल. फ्रंटला 8-मेगापिक्सलचा सेन्सर असेल. बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्ससह कंपनी यात साईड फिंगरप्रिंट सेन्सर मिळेल.