Samsung Galaxy M33 5G विरुद्ध Realme 9 5G SE; कोणता स्मार्टफोन देतो तुमच्या पैशांना न्याय?

By सिद्धेश जाधव | Published: April 5, 2022 01:06 PM2022-04-05T13:06:26+5:302022-04-05T13:06:48+5:30

Samsung Galaxy M33 5G स्मार्टफोन ज्या किंमतीत लाँच झाला आहे. त्या किंमतीत Realme 9 5G SE (Speed Edition) देखील विकत घेता येतो.  

Samsung Galaxy M33 5G Vs Realme 9 5G SE Comparison Of Price Features Specifications  | Samsung Galaxy M33 5G विरुद्ध Realme 9 5G SE; कोणता स्मार्टफोन देतो तुमच्या पैशांना न्याय?

Samsung Galaxy M33 5G विरुद्ध Realme 9 5G SE; कोणता स्मार्टफोन देतो तुमच्या पैशांना न्याय?

Next

Samsung Galaxy M33 5G स्मार्टफोन भारतात काही दिवसांपूर्वी लाँच झाला आहे. हा फोन 6000mAh बॅटरी, 50MP रियर कॅमेरा अशा फीचर्ससह 18,999 रुपयांच्या बेस किंमतीत आला आहे. जवळपास एवढ्याच बजेटमध्ये रियलमीचा Realme 9 5G SE (Speed Edition) स्मार्टफोन देखील विकत घेता येत आहे. त्यामुळे जर यापैकी कोणत्या फोनची निवड करावी असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. इथे आपण या दोन्ही मोबाईल्सच्या किंमत, फीचर्स आणि स्पेक्सची तुलना करणार आहोत.  

डिस्प्ले  

सॅमसंगचा 5G स्मार्टफोन 6.6 इंचाच्या FHD+ डिस्प्लेसह येतो. हा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 च्या सुरक्षेसह सादर करण्यात आला आहे. Realme 9 5G SE मध्ये देखील 6.6 इंचाचा FHD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. जो 144Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. 

प्रोसेसर 

Galaxy M33 5G मध्ये Exynos चा 5nm प्रोसेसवर बनलेला ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन Android 12 ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. रियलमीच्या फोनमध्ये Qualcomm Snapdragon 778G प्रोसेसर देण्यात आला आहे. हा Android 11 वर आधारित Realme UI 2.0 वर चालतो.

बॅटरी  

Galaxy M33 5G मध्ये 6000mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. जी 25W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. तर Realme 9 5G SE मध्ये कंपनीनं 5000mAh ची बॅटरी दिली आहे, जी 30W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.  

कॅमेरा 

Galaxy M33 5G च्या मागे क्वॉड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात 50MP चा प्रायमरी कॅमेरा, 5MP चा अल्ट्रा वाईड सेन्सर, 2MP चा मॅक्रो आणि 2MP चा डेप्थ सेन्सर मिळतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 8MP चा फ्रंट सेन्सर आहे.  

Realme 9 5G SE ट्रिपल कॅमेरा सेटअपसह बाजारात आला आहे. ज्यात 48MP चा मुख्य कॅमेरा कंपनीनं दिला आहे. सोबत 2MP चे दोन कॅमेरा सेन्सर मिळतात. फ्रंटला 16MP चा सेल्फी शुटर देण्यात आला आहे.  

किंमत  

Samsung Galaxy M33 5G च्या 6GB RAM व 128GB स्टोरेज मॉडेलची किंमत 18,999 रुपये आहे. तर 8GB RAM व 128GB मॉडेलसाठी 20,499 रुपये द्यावे लागतील. तर Realme 9 5G SE स्मार्टफोनचा 6GB RAM व 128GB व्हेरिएंट 19,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच 8GB RAM व 128GB स्टोरेजसाठी 22,999 रुपये मोजावे लागतील.   

फीचर्सGalaxy M33 5GRealme 9 5G SE
डिस्प्ले6.6 इंच FHD+, 120Hz6.6 इंच FHD+, 144Hz
प्रोसेसर5nm Octa-Core ExynosQualcomm Snapdragon 778G
बॅटरी6000mAh, 25W5000mAh, 30W
कॅमेरा50MP+5MP+2MP+2MP रियर, 8MP सेल्फी कॅमेरा48MP+2MP+2MP रियर, 16MP सेल्फी
किंमत 18,999 रुपये (6GB/128GB), 20,499 रुपये (8GB/128GB)19,999 रुपये (6GB/128GB), 22,999 रुपये (8GB/128GB)

 

Web Title: Samsung Galaxy M33 5G Vs Realme 9 5G SE Comparison Of Price Features Specifications 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.