Samsung ची जबरदस्त ऑफर! 5G Smartphone वर मिळतेय 10 हजार रुपयांची सूट 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2022 04:56 PM2022-06-25T16:56:53+5:302022-06-25T16:57:02+5:30

Samsung Galaxy M52 5G स्मार्टफोनवर 10000 रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे. यासाठी तुम्हाला जुना फोन एक्सचेंज करण्याची गरज नाही.

Samsung galaxy m52 5g is available with 10000 rupees discount on reliance digital  | Samsung ची जबरदस्त ऑफर! 5G Smartphone वर मिळतेय 10 हजार रुपयांची सूट 

Samsung ची जबरदस्त ऑफर! 5G Smartphone वर मिळतेय 10 हजार रुपयांची सूट 

Next

Samsung Galaxy M52 5G स्मार्टफोनमध्ये गेल्या महिन्यात सॅमसंगने Galaxy M52 हा 5G Phone लाँच केला होता. या फोनमध्ये Qualcomm Snapdragon 778G चिपसेट, 8GB RAM, 64MP Rear आणि 32MP Selfie Camera असे भन्नाट फिचर देण्यात आले आहेत. आता या जबरदस्त डिवाइसवर 10 हजार रुपयांचा थेट डिस्काउंट दिला जात आहे. परंतु ही सूट अ‍ॅमेझॉन किंवा फ्लिपकार्टवर नव्हे तर Reliance Digital वर दिली जात आहे.  

रिलायन्स डिजिटलची ऑफर 

Samsung Galaxy M52 5G स्मार्टफोन तुम्ही रिलायन्स डिजिटलवरून विकत घेतल्यास तुम्हाला 10 हजार रुपयांचा थेट डिस्काउंट मिळेल. ही ऑफर स्मार्टफोनच्या 8GB RAM असलेला व्हेरिएंटवर दिली जात आहे. जो 31,999 रुपयांच्या ऐवजी 21,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तर 6GB RAM मॉडेलवर देखील 9 हजारांची सूट दिली जात आहे, त्यामुळे 29,999 रुपयांचा हा फोन 20,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.  

Samsung Galaxy M52 5G चे स्पेसिफिकेशन्स  

सॅमसंग गॅलेक्सी M52 5G मध्ये 6.7 इंचाचा फुल-एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. या सुपर अ‍ॅमोलेड डिस्प्लेचे रिजोल्यूशन 1080×2400 पिक्सल आणि रिफ्रेश रेट 120 हर्ट्ज आहे. यात स्नॅपड्रॅगन 778G प्रोसेसरचा वापर कंपनीने केला आहे. त्याचबरोबर 6GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे, जी मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने वाढवता येते. 

फोटोग्राफीसाठी Galaxy M52 5G मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. या सेटअपमधील मुख्य कॅमेरा 64 मेगापिक्सल रिजोल्यूशनसह सादर करण्यात आला आहे. त्याचबरोबर 12 मेगापिक्सलची अल्ट्रा-वाईड लेन्स आणि 5 मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर मिळतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 32 पिगापिक्सलचा फ्रंट आहे. हा डिवाइस 25W फास्ट-चार्जिंग सपोर्ट असलेल्या 5,000mAh च्या बॅटरीसह बाजारात आला आहे. सिक्योरिटीसाठी या 5G फोनमध्ये साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. तर कनेक्टिविटीसाठी हँडसेटमध्ये वाय-फाय, ब्लूटूथ 5.0, जीपीएस, एनएफसी, 5जी आणि टाइप-सी पोर्ट असे पर्याय उपलब्ध आहेत. 

Web Title: Samsung galaxy m52 5g is available with 10000 rupees discount on reliance digital 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.