खुशखबर! 108MP कॅमेरा असेलल्या Samsung स्मार्टफोनची किंमत झाली कमी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2022 12:57 PM2022-05-31T12:57:38+5:302022-05-31T12:57:50+5:30
Samsung Galaxy M53 5G स्मार्टफोनवर अॅमेझॉन इन्स्टंट डिस्काउंट देत आहे.
Samsung Galaxy M53 5G स्मार्टफोन काही दिवसांपूर्वी भारतात लाँच झाला आहे. या फोनची सर्वात मोठी खासियत म्हणजे यात मिळणारा 108MP चा कॅमेरा, जो जगातील सर्वात मोठा फोन कॅमेरा सेन्सर आहे. आता हा स्मार्टफोन अॅमेझॉन इंडियावर डिस्काउंटसह उपलब्ध झाला आहे. त्यामुळे जर तुम्ही शानदार कॅमेरा असेलला हँडसेट शोधत असाल तर तुम्ही या ऑफरचा फायदा घेऊ शकता.
किंमत आणि ऑफर्स
Samsung Galaxy M53 5G स्मार्टफोनच्या 6GB रॅम व्हेरिएंटवर 2500 रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट दिला जात आहे. यासाठी तुम्हाला ICICI बँकेच्या क्रेडिट कार्डचा वापर करून पेमेंट करावा लागेल. तसेच तुम्ही एक्सचेंज ऑफरचा करून 10,550 रुपयांची सूट मिळू शकतो. Samsung Galaxy M53 5G स्मार्टफोन अॅमेझॉनवर 26,499 रुपयांमध्ये लिस्ट झाला आहे.
Samsung Galaxy M53 5G चे स्पेसिफिकेशन्स
Samsung Galaxy M53 5G स्मार्टफोनमध्ये 6.7-इंचाचा फुलएचडी+ सुपर अॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आह, जो 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. पंच होल डिजाईनसह यात कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ची सुरक्षा देण्यात आली आहे. हा फोन अँड्रॉइड 12 आधारित वनयुआय 4.2 वर चालतो. आहे. यात MediaTek Dimensity 900 चिपसेट आणि Mali-G68 MP4 GPU मिळतो. सोबत एक्सपांडेबल रॅम फिचर देण्यात आलं आहे.
Samsung Galaxy M53 5G स्मार्टफोनमध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यातील मुख्य कॅमेरा 108MP चा आहे, सोबत 8MP ची अल्ट्रा वाईड लेन्स, 2MP चा मॅक्रो सेन्सर आणि 2MP डेप्थ सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 32MP चा सेल्फी कॅमेरा आहे. पावर बॅकअपसाठी 5000mAh ची बॅटरी 25W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते