108MP चा कॅमेरा असलेला सर्वात स्वस्त Samsung फोन आला भारतात; मिळतेय 5000mAh बॅटरी  

By सिद्धेश जाधव | Published: April 22, 2022 03:14 PM2022-04-22T15:14:01+5:302022-04-22T15:14:16+5:30

Samsung Galaxy M53 5G स्मार्टफोन भारतात 108MP चा कॅमेरा, 8GB RAM, MediaTek Dimensity 900 चिपसेट आणि 5000mAh बॅटरीसह लाँच झाला आहे.  

Samsung Galaxy M53 Smartphone Launched With 108MP Primary Camera  | 108MP चा कॅमेरा असलेला सर्वात स्वस्त Samsung फोन आला भारतात; मिळतेय 5000mAh बॅटरी  

108MP चा कॅमेरा असलेला सर्वात स्वस्त Samsung फोन आला भारतात; मिळतेय 5000mAh बॅटरी  

Next

Samsung Galaxy M53 स्मार्टफोन कित्येक दिवस चर्चेत राहिल्यानंतर भारतात लाँच झाला आहे. हा फोन 108MP चा कॅमेरा, 8GB RAM, MediaTek Dimensity 900 चिपसेट आणि 5000mAh बॅटरीसह बाजारात आला आहे. एवढा मोठा कॅमेरा सेन्सर असलेला हा सॅमसंगचा सर्वात स्वस्त डिवाइस आहे. या लेखात आपण सॅमसंगच्या लेटेस्ट Galaxy M53 स्मार्टफोनची माहिती घेणार आहोत.  

Samsung Galaxy M53 चे स्पेसिफिकेशन्स 

Samsung Galaxy M53 5G स्मार्टफोनमध्ये 6.7-इंचाचा फुलएचडी+ सुपर अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आह, जो 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. पंच होल डिजाईनसह यात कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ची सुरक्षा देण्यात आली आहे. हा फोन अँड्रॉइड 12 आधारित वनयुआय 4.2 वर चालतो. आहे. यात MediaTek Dimensity 900 चिपसेट आणि Mali-G68 MP4 GPU मिळतो. सोबत एक्सपांडेबल रॅम फिचर देण्यात आलं आहे.  

Samsung Galaxy M53 5G स्मार्टफोनमध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यातील मुख्य कॅमेरा 108MP चा आहे, सोबत 8MP ची अल्ट्रा वाईड लेन्स, 2MP चा मॅक्रो सेन्सर आणि 2MP डेप्थ सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 32MP चा सेल्फी कॅमेरा आहे. पावर बॅकअपसाठी 5000mAh ची बॅटरी 25W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.  

Samsung Galaxy M53 ची किंमत 

Samsung Galaxy M53 स्मार्टफोनचे दोन मॉडेल भारतीयांच्या भेटीला आले आहेत. यातील 6GB रॅम व 128GB स्टोरेजची किंमत 23,999 रुपये ठेवण्यात आली आहे. तर 8GB रॅम आणि 128GB मेमरी व्हेरिएंट 24,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. हा फोन ग्रीन आणि ब्लू कलर ऑप्शनमध्ये सादर करण्यात आला आहे. 

Web Title: Samsung Galaxy M53 Smartphone Launched With 108MP Primary Camera 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.