Samsung चा ‘हा’ फ्लॅगशिप स्मार्टफोन 18000 रुपयांनी स्वस्त; 12GB रॅम असलेला फोन विकत घेण्याची सुवर्णसंधी
By सिद्धेश जाधव | Published: July 27, 2021 11:31 AM2021-07-27T11:31:56+5:302021-07-27T11:33:33+5:30
Samsung Galaxy Note 20 Price Drop: सॅमसंग गॅलेक्सी नोट 20 च्या किंमतीत कंपनीने 18,000 रुपयांची कपात केली आहे, ही कायमस्वरूपी कपात आहे.
Samsung ने गेल्यावर्षी आपल्या फ्लॅगशिप ‘गॅलेक्सी नोट’ सीरीजमध्ये Samsung Galaxy Note 20 आणि Samsung Galaxy Note 20 Ultra 5G हे दोन स्मार्टफोन लाँच केले होते. या पैकी गॅलेक्सी नोट 20 ची किंमत लाँचच्या वेळी 77,999 रुपये ठेवण्यात आली होती. परंतु आता 12GB रॅम असलेल्या या फोनची किंमत कंपनीने थेट 18,000 रुपयांनी कमी केली आहे. पुढच्या महिन्यात कंपनी आपले फोल्डेबल स्मार्टफोन्स लाँच करणार आहे, त्यामुळे कंपनीने या फ्लॅगशिप फोनची किंमत कमी केल्याची चर्चा आहे. या प्राइस कटनंतर Samsung Galaxy Note 20 आता फक्त 59,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल.
Samsung Galaxy Note 20 ची नवीन किंमत
सॅमसंग गॅलेक्सी नोट 20 च्या किंमतीत कंपनीने 18,000 रुपयांची कपात केली आहे, ही कायमस्वरूपी कपात आहे. त्यामुळे 77,999 रुपयांमध्ये लाँच झालेला हा पावरफुल फोन आतापासून 59,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.
Samsung Galaxy Note 20 चे स्पेसिफिकेशन्स
सॅमसंग गॅलेक्सी नोट 20 मध्ये 6.7-इंचाचा फुल-एचडी+ सुपर अॅमोलेड डिस्प्ले मिळतो. हा डिस्प्ले 1080×2400 पिक्सल रिजोल्यूशन आणि 20:9 अस्पेक्ट रेशियोसह सादर करण्यात आला आहे. या फोनमध्ये 8GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंतची इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे.
Galaxy Note 20 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. यात 12 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड कॅमेरा, 12-मेगापिक्सलचा वाईड-अँगल कॅमेरा आणि 64 मेगापिक्सलचा टेलिफोटो सेन्सर देण्यात आला आहे. हा सॅमसंग फोन 10 मेगापिक्सलच्या सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी Galaxy Note 20 मध्ये 4,300mAh ची बॅटरी आहे.