Samsung नं घेतला मोठा निर्णय; आता येणार नाहीत सर्वात शक्तिशाली स्मार्टफोन, जाणून घ्या कारण
By सिद्धेश जाधव | Published: March 2, 2022 03:51 PM2022-03-02T15:51:40+5:302022-03-02T15:51:53+5:30
सॅमसंगननं 2020 मध्ये Galaxy Note 20 Series सादर केली होती. त्यानंतर कंपनीनं पुन्हा ही सीरिज सादर केली नाही.
सॅमसंगनं अधिकृतपणे Galaxy Note स्मार्टफोन सीरीज बंद केली आहे. या प्रतिष्ठित स्मार्टफोन सीरिजची जागा आता Galaxy S-सीरीजमधील अल्ट्रा मॉडेल घेत आहे. यंदाच्या मोबाईल वर्ल्ड कांग्रेस (MWC) 2022 मधून कंपनीनं ही घोषणा केली आहे. सॅमसंग स्मार्टफोन चीफ Roh Tae-Moon यांनी इव्हेंटमध म्हटले कि, “Galaxy Note आता Ultra नावानं येईल.”
Galaxy Note ची जागा Galaxy S Ultra घेणार
शेवटची नोट सीरिज 2020 मध्ये Galaxy Note 20 नावानं सादर करण्यात आली होती. परंतु त्यानंतर Galaxy S सीरिजच्या Ultra मॉडेलमध्ये नोट सीरिजची ओळख असलेला S-Pen सपोर्ट देण्यात आला. गेल्यावर्षी कंपनीनं नोट सीरिज यंदा येणार नाही, असं सांगितलं. परंतु कायमची बंद करण्याबाबत कंपनीनं कोणतीही माहिती दिली नव्हती.
यंदा आलेल्या Galaxy S22 Ultra स्मार्टफोनमध्ये कंपनीनं S-Pen सपोर्टसह स्टायलस ठेवण्यासाठी एक खास जागा दिली आहे. असा स्लॉट याआधी फक्त नोट सीरीजमध्ये मिळत असे. यामुळे Galaxy Note 21 सीरीज कधीच येणार नसल्याचं लोकांना वाटू लागलं होतं. आणि आता MWC 2022 च्या मंचावरून सॅमसंगनं नोट सीरीज संपल्याची अधिकृत घोषणा केली आहे.
हे देखील वाचा:
- चोर शिरताच वाजेल अलार्म! फक्त 99 रुपयांमध्ये घराचं रक्षण करेल ‘हा’ छोटासा कॅमेरा
- 190 रुपयांमध्ये मिळवा Vivo सर्वात पातळ 5G Smartphone; दिवसभर पुरेल यातील 5000mAh ची बॅटरी
- 15 हजारांच्या आत शानदार Xiaomi फोन लाँच; 5,000mAh Battery आणि 50MP Camera