असा असेल Samsung Galaxy S10 Lite स्मार्टफोन; फीचर्स आणि किंमत लीक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2019 11:48 AM2019-01-10T11:48:41+5:302019-01-10T13:07:01+5:30
Samsung Galaxy S10 lite या स्मार्टफोनमध्ये 5.8 इंचाचा Infinity-O-display मिळणार आहे. तसेच पंच होल डिस्प्लेसोबतच फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. Samsung Galaxy S10 lite मध्ये एक साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर पण मिळेल.
नवी दिल्ली - सॅमसंग ही कंपनी नेहमीच ग्राहकांसाठी नवनवीन दर्जेदार स्मार्टफोन लाँच करत असते. लवकरच सॅमसंग आपल्या फ्लॅगशिप स्मार्टफोनची नवी गॅलेक्सी S10 सीरिज आणणार आहे. या फ्लॅगशिप सीरिजमध्ये कंपनी एकदम दोन स्मार्टफोन लाँच करत आली आहे. मात्र यावेळी सॅमसंग S10 सीरिज अंतर्गत एकदम तीन मॉडेल लाँच करणार आहे. यात Samsung Galaxy S10, Samsung Galaxy S10+ आणि Samsung Galaxy S10 lite या मॉडेल्सचा समावेश असणार आहे.
Samsung Galaxy S10 lite या स्मार्टफोनमध्ये 5.8 इंचाचा Infinity-O-display मिळणार आहे. तसेच पंच होल डिस्प्लेसोबतच फ्रंट कॅमेरा देण्यात येण्याची शक्यता आहे. Samsung Galaxy S10 lite मध्ये एक साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर पण मिळेल. तसेच स्मार्टफोनमध्ये तुम्हाला ड्यूल कॅमेरा सेटअपसह 3,100 एमएएचची बॅटरी देण्यात येईल. या स्मार्टफोनमध्ये 6 जीबी रॅमसह Qualcomm Snapdragon 855 SoC प्रोसेसर किंवा Exynos 9820 SoC प्रोसेसर देण्यात येण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, black, blue, green, yellow and white अशा पाच रंगात हा स्मार्टफोन उपलब्ध होणार आहे. तसेच साधारण Samsung Galaxy S10 lite ची किंमत 60,500 रुपये असू शकते. Samsung Galaxy S10 सीरिजचं लाँचिंग फेब्रुवारीत होणाऱ्या Mobile World Congress 2019 च्या आसपास होण्याची शक्यता आहे. याआधीच तिन्ही स्मार्टफोनच्या बॅटरीची क्षमता आणि डिस्प्ले साइझसह अन्य फीचर्स सर्वत्र लीक झाली आहेत.
Samsung Galaxy S10 lite आधी Samsung Galaxy S10 चे फीचर लीक झाले आहेत. Samsung Galaxy S10 मध्ये पंच होल डिस्प्लेसोबत इन डिस्प्ले फ्रन्ट कॅमेरा देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. या स्मार्टफोनमध्ये 12 मेगापिक्सलचा वाइड अँगल कॅमेरा, 12 मेगापिक्सलचा टेलिफोटो कॅमेरा आणि 16 मेगापिक्सलचा 120 अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा देण्याची शक्यता आहे. Samsung Galaxy S10 मध्ये Exynos 9820 Soc प्रोसेसर किंवा Snapdragon 855 Soc प्रोसेसर आणि 6.4 इंचाचा Super AMOLED डिस्प्ले देण्याची शक्यता आहे. Samsung Galaxy S10+ मध्ये पंच होल डिस्प्लेसोबतच ड्युअल फ्रंट कॅमेरा सेटअप देण्याची शक्यता आहे.