Samsung च्या 'या' 5G फोनच्या किंमतीत 5,000 रुपयांची कपात; जाणून घ्या फ्लॅगशीप स्मार्टफोनची नवीन किंमत 

By सिद्धेश जाधव | Published: August 30, 2021 12:30 PM2021-08-30T12:30:00+5:302021-08-30T12:31:09+5:30

Samsung Galaxy S20 FE 5G Price: Galaxy S20 FE 5G च्या किंमतीत 5,000 रुपयांची कपात केली आहे. या कायमस्वरूपी कपातीमुळे हा स्मार्टफोन आता 49,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.  

Samsung galaxy s20 fe 5g price cut in india  | Samsung च्या 'या' 5G फोनच्या किंमतीत 5,000 रुपयांची कपात; जाणून घ्या फ्लॅगशीप स्मार्टफोनची नवीन किंमत 

Samsung च्या 'या' 5G फोनच्या किंमतीत 5,000 रुपयांची कपात; जाणून घ्या फ्लॅगशीप स्मार्टफोनची नवीन किंमत 

googlenewsNext

Samsung च्या आगामी Galaxy S21 FE स्मार्टफोनचे लिक्स रिपोर्ट्स येण्यास खूप आधीच सुरुवात झाली होती. आता या फोनचा लाँच देखील नजीकच आहे. कदाचित त्यामुळेच कंपनीचे जुन्या Samsung Galaxy S20 FE 5G स्मार्टफोनची किंमत कमी केली असावी. हा स्मार्टफोन यावर्षी मार्चमध्ये 54,999 रुपयांमध्ये सादर केला होता. आता कंपनीने Galaxy S20 FE 5G च्या किंमतीत 5,000 रुपयांची कपात केली आहे. या कायमस्वरूपी कपातीमुळे हा स्मार्टफोन आता 49,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.  

91mobiles ला Galaxy S20 FE 5G च्या नवीन किंमतीची माहिती ऑफलाइन रिटेल स्टोरकडून मिळाली आहे. सॅमसंग इंडियाच्या अधिकृत वेबसाईटवर देखील हा स्मार्टफोन नव्या किंमतीत लिस्ट करण्यात आला आहे. परंतु सॅमसंगच्या वेबसाईटवर या फोनची नवीन किंमत 1,000 रुपये जास्त आहे. कंपनीच्या वेबसाईटवर Galaxy S20 FE 5G स्मार्टफोन 50,999 रुपयांमध्ये लिस्ट करण्यात आला आहे. इथे या स्मार्टफोनवर जुना फोन एक्सचेंज केल्यानंतर 34,559 रुपयांपर्यंतच्या बेनिफिटसह विकत घेता येईल.  

Samsung Galaxy S20 FE 5G के स्पेसिफिकेशन 

Samsung Galaxy S20 FE 5G मध्ये 6.5 इंचाचा फुल HD+ डिस्प्लेसह देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 1080×2400 पिक्सल आणि रिजोल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेटसह येतो. फोनमध्ये सेल्फीसाठी पंच होल कटआउट आहे. तसेच प्रोसेसिंगसाठी सॅमसंगच्या या फोनमध्ये ऑक्टा-कोर Qualcomm Snapdragon 865 प्रोसेसर देण्यात आला आहे जो 8GB रॅमसह येतो. या स्मार्टफोनची 128GB इंटरनल स्टोरेज माइक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून 1TB पर्यंत वाढवता येते.  

Samsung Galaxy S20 FE 5G स्मार्टफोन Android 10 वर आधारित OneUI वर चालतो. Samsung Galaxy S20 FE 5G स्मार्टफोन IP68 रेटिंग सह येतो. कॅमेरा स्पेसिफिकेशन्स पाहता, यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या फोनमध्ये 12 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आहे. त्याचबरोबर फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा टेलीफोटो कॅमेरा आणि 12 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस मिळते. सेल्फीसाठी हा फोन 32 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. सॅमसंगच्या या फोनमध्ये 4500mAh ची बॅटरी मिळते जी 25W फास्ट चार्जला सपोर्ट करते. 

Web Title: Samsung galaxy s20 fe 5g price cut in india 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.