चुकवू नका सुवर्णसंधी! 23 हजार देऊन मिळवा Samsung चा 40 हजारांचा फ्लॅगशिप फोन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2022 01:23 PM2022-02-16T13:23:35+5:302022-02-16T13:24:37+5:30
Samsung Galaxy S20 स्मार्टफोनवर अॅमेझॉन मोठा डिस्काउंट देत आहे. या सवलतीमुळे हा फ्लॅगशिप स्मार्टफोन 23 हजारांमध्ये उपलब्ध झाला आहे.
Samsung नं काही दिवसांपूर्वी आपली सर्वात शक्तिशाली Galaxy S22 सीरिज जागतिक बाजारात उतरवली आहे. ही सीरिज लवकरच भारतात देखील उपलब्ध होणार आहे. या सीरिजची किंमत 70 हजारांपासून सुरु होऊ शकते. परंतु तुम्हाला स्वस्तात सॅमसंगचा फ्लॅगशिप अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही अॅमेझॉनवरील Samsung Galaxy S20 FE स्मार्टफोन मोठ्या डिस्काउंटसह विकत घेऊ शकता.
Samsung Galaxy S20 FE ची किंमत आणि डिस्काउंट
Samsung Galaxy S20 FE स्मार्टफोन कंपनीच्या वेबसाईटवर 39,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. परंतु अॅमेझॉन हा फोन 36,990 रुपयांमध्ये विकत आहे. यावर 14,900 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर मिळत आहे. यासाठी तुम्हाला योग्य जुना फोन द्यावा लागेल. तसेच फेडरबल बँकेच्या क्रेडिट कार्डने पेमेंटवर तुम्हाला 2 हजार रुपयांपर्यंतची सूट मिळेल. या सर्व ऑफर्स एकत्र केल्यावर हा फ्लॅगशिप सॅमसंग 23 हजारांच्या आसपासच्या किंमतीत तुमचा होईल.
Samsung Galaxy S20 FE 5G चे स्पेसिफिकेशन
Samsung Galaxy S20 FE 5G स्मार्टफोन Android 10 वर आधारित OneUI वर चालतो. Samsung Galaxy S20 FE 5G स्मार्टफोन IP68 रेटिंग सह येतो. कॅमेरा स्पेसिफिकेशन्स पाहता, यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या फोनमध्ये 12 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आहे. त्याचबरोबर फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा टेलीफोटो कॅमेरा आणि 12 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस मिळते. सेल्फीसाठी हा फोन 32 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. सॅमसंगच्या या फोनमध्ये 4500mAh ची बॅटरी मिळते जी 25W फास्ट चार्जला सपोर्ट करते.
Samsung Galaxy S20 FE 5G मध्ये 6.5 इंचाचा फुल HD+ डिस्प्लेसह देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 1080×2400 पिक्सल आणि रिजोल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेटसह येतो. फोनमध्ये सेल्फीसाठी पंच होल कटआउट आहे. तसेच प्रोसेसिंगसाठी सॅमसंगच्या या फोनमध्ये ऑक्टा-कोर Qualcomm Snapdragon 865 प्रोसेसर देण्यात आला आहे जो 8GB रॅमसह येतो. या स्मार्टफोनची 128GB इंटरनल स्टोरेज माइक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून 1TB पर्यंत वाढवता येते.
हे देखील वाचा:
- मामुली किंमतीत रियलमीचा शानदार फोन; स्वस्त आणि मस्त Realme C31 घेणार भारतात एंट्री
- आताच खरेदी करून ठेवा ‘हे’ गॅजेट्स; लवकरच बदलणार Smartphone पासून Refrigerator च्या किंमती