Smartphone Offers : 75 हजारांचा फोन मिळवा 35 हजारांत; दमदार स्मार्टफोन घेण्यासाठी करा फक्त एवढंच काम...
By सिद्धेश जाधव | Published: January 12, 2022 06:19 PM2022-01-12T18:19:11+5:302022-01-12T18:20:47+5:30
Samsung Galaxy S21 FE 5G फोन लाँचनंतर लगेचच कमी किंमतीत विकत घेण्याची संधी Amazon नं दिली आहे. हा फोन 8GB RAM, 32MP Selfie Camera, Exynos 2100 प्रोसेसर आणि Android 12 सह सादर करण्यात आला आहे.
Samsung Galaxy S21 FE 5G स्मार्टफोन नुकताच भारतीय बाजारात दाखल झाला आहे. हा बहुप्रतीक्षित फोन 8GB RAM, 32MP Selfie Camera, Exynos 2100 प्रोसेसर आणि Android 12 सह सादर करण्यात आला आहे. लाँच होऊन अजून काही दिवसही झाले नसताना हा सॅमसंगचा फ्लॅगशिप स्मार्टफोन मोठ्या डिस्काउंटसह विकत घेण्याची संधी मिळत आहे. अॅमेझॉन इंडिया देत असलेल्या थेट डिस्काउंट, बँक ऑफर्स आणि एक्सचेंज बोनसनंतर जवळपास 75 हजारांचा हा फोन 35 हजार देऊन घरी आणता येईल.
Samsung Galaxy S21 FE 5G च्या 8GB RAM आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 74,999 रुपये आहे. यावर अॅमेझॉनकडून 20,000 हजार रुपयांचा थेट डिस्काउंट दिला जात आहे, त्यामुळे याची किंमत 54,999 रुपये झाली आहे. सोबत HDFC बँकेच्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डनं पेमेंट केल्यास तुम्ही अजून 5000 रुपये वाचवू शकता आणि तुमच्याकड्चा जुना स्मार्टफोन एक्सचेंज करून तुम्ही 14,900 रुपयांची आणखीन बचत करू शकता.
Samsung Galaxy S21 FE 5G चे स्पेसिफिकेशन्स
Samsung Galaxy S21 FE स्मार्टफोनमध्ये 6.4-इंचाचा फुल एचडी+ डायनॅमिक अॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. हा पंच होल डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. सॅमसंगचा हा स्मार्टफोन Exynos 2100 प्रोसेसरसह सादर करण्यात आला आहे. कंपनीनं यात 8GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंतची स्टोरेज दिली आहे. Samsung चा हा फ्लॅगशिप स्मार्टफोन Android 12 वर आधारित One UI 4.0 वर चालतो.
Galaxy S21 FE मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात 12MP चा चा अल्ट्रा वाईड प्रायमरी कॅमेरा, 12MP ची सेकंडरी लेन्स आणि 8MP चा टेलीफोटो सेन्सर मिळतो. सॅमसंगच्या या फोनमध्ये 32MP चा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. बेसिक कनेक्टिव्हिटीसह येणारा हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरला सपोर्ट करतो. तसेच यात फोन स्टीरियो स्पिकर आणि IP68 रेटिंग देण्यात आली आहे.पॉवर बॅकअपसाठी यात 4,500mAh ची बॅटरी 25W फास्ट चार्जिंगसह देण्यात आली आहे.
हे देखील वाचा:
OnePlus लवर्सना जोरदार झटका! कंपनीनं बंद केला लोकप्रिय स्मार्टफोन; उरले फक्त काही हँडसेट