प्रतीक्षा संपली! भारतात आला पॉवरफुल Samsung Galaxy S21 FE स्मार्टफोन; वनप्लसला सडेतोड उत्तर
By सिद्धेश जाधव | Published: January 10, 2022 03:38 PM2022-01-10T15:38:36+5:302022-01-10T15:38:47+5:30
Samsung Galaxy S21 FE 5G: Samsung Galaxy S21 FE 5G भारतात 8GB RAM, 32MP Selfie Camera, Exynos 2100 प्रोसेसर आणि Android 12 सह सादर करण्यात आला आहे.
Samsung चे जगभरातील चाहते गेले कित्येक महिने Samsung Galaxy S21 FE ची वाट बघत होते. आता अखेरीस हा आधी जागतिक बाजारात आणि आज भारतात अधिकृतपणे लाँच झाला आहे. कमी किंमतीती फ्लॅगशिप प्रोसेसर आणि स्पेक्ससह येणारा हा सॅमसंगचा नवीन स्मार्टफोन आहे. याची थेट टक्कर वनप्लसच्या फ्लॅगशिप फोन्स सोबत आहे. चला जाणून Galaxy S21 FE म्हणजे Samsung Galaxy S21 Fan Edition चे स्पेसिफिकेशन्स आणि किंमत.
Samsung Galaxy S21 FE 5G ची किंमत
सॅमसंग गॅलेक्सी एस21 फॅन एडिशनचे दोन व्हेरिएंट भारतात आले आहेत. यातील 8GB RAM आणि 128GB Storage व्हेरिएंटची किंमत 49,999 रुपये ठेवण्यात आली आहे. तर 8GB RAM आणि 256GB Storage व्हेरिएंट भारतात 53,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. उद्यापासून हा फोन अॅमेझॉन आणि ऑफलाईन रिटेलर्सकडून विकत घेता येईल. एचडीएफसी बँकेचे कार्ड धारक हा फोन 5,000 रुपयांचा डिस्काउंटसह विकत घेऊ शकतील.
Samsung Galaxy S21 FE 5G चे स्पेसिफिकेशन्स
Samsung Galaxy S21 FE स्मार्टफोनमध्ये 6.4-इंचाचा फुल एचडी+ डायनॅमिक अॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. हा पंच होल डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. सॅमसंगचा हा स्मार्टफोन Exynos 2100 प्रोसेसरसह सादर करण्यात आला आहे. कंपनीनं यात 8GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंतची स्टोरेज दिली आहे. Samsung चा हा फ्लॅगशिप स्मार्टफोन Android 12 वर आधारित One UI 4.0 वर चालतो.
Galaxy S21 FE मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात 12MP चा चा अल्ट्रा वाईड प्रायमरी कॅमेरा, 12MP ची सेकंडरी लेन्स आणि 8MP चा टेलीफोटो सेन्सर मिळतो. सॅमसंगच्या या फोनमध्ये 32MP चा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. बेसिक कनेक्टिव्हिटीसह येणारा हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरला सपोर्ट करतो. तसेच यात फोन स्टीरियो स्पिकर आणि IP68 रेटिंग देण्यात आली आहे.पॉवर बॅकअपसाठी यात 4,500mAh ची बॅटरी 25W फास्ट चार्जिंगसह देण्यात आली आहे.
हे देखील वाचा:
हॅकर्सच्या हातात आयतं कोलीत देऊ नका; UPI पेमेंट करताना या 5 चुका टाळा, नाही तर...