धमाकेदार Samsung Galaxy S21 FE 5G लाँचच्या उंबरठ्यावर; वेबसाईटवर सपोर्ट पेज झाले लाईव्ह 

By सिद्धेश जाधव | Published: September 18, 2021 07:16 PM2021-09-18T19:16:16+5:302021-09-18T19:16:23+5:30

बहुप्रतीक्षित Samsung Galaxy S21 FE 5G स्मार्टफोन लवकरच लाँच होऊ शकतो. सॅमसंग जर्मनीच्या वेबसाईटवर या स्मार्टफोनचा सपोर्ट पेज लाईव्ह झाला आहे.  

Samsung galaxy s21 fe 5g listed on german website with qualcomm snapdragon 888 soc   | धमाकेदार Samsung Galaxy S21 FE 5G लाँचच्या उंबरठ्यावर; वेबसाईटवर सपोर्ट पेज झाले लाईव्ह 

धमाकेदार Samsung Galaxy S21 FE 5G लाँचच्या उंबरठ्यावर; वेबसाईटवर सपोर्ट पेज झाले लाईव्ह 

Next

गेले कित्येक दिवस लिक्स आणि रिपोर्ट्समधून Samsung Galaxy S21 FE 5G स्मार्टफोनची माहिती समोर येत आहे. आता हा बहुप्रतीक्षित स्मार्टफोनसॅमसंग जर्मनीच्या वेबसाईटवर लिस्ट करण्यात आला आहे. कंपनीने अजूनतरी या फोनच्या लाँचची कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. परंतु सपोर्ट पेज लाईव्ह झाल्यामुळे हा फोन लवकरच लाँच केला जाऊ शकतो, असे वाटत आहे.  

Samsung Galaxy S21 FE चे स्पेसिफिकेशन्स  

Samsung Galaxy S21 FE स्मार्टफोनमध्ये फुल एचडी+ डिस्प्ले देण्यात येईल. हा डिस्प्ले पंच होल डिजाईनसह सादर केला जाईल. प्रोसेसिंगच्या बाबतीत या स्मार्टफोनचे फ्लॅगशिप स्टेटस दिसून येते. Galaxy S21 FE मध्ये Qualcomm Snapdragon 888 SoC देण्यात येईल. तसेच फोनमध्ये 6GB RAM आणि Adreno 660 GPU मिळू शकतो.    

Samsung Galaxy S21 FE च्या बॅक पॅनलवर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळू शकतो. याआधी आलेल्या रिपोर्ट्सनुसार या स्मार्टफोनमध्ये 12MP चा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आणि 32MP सेल्फी कॅमेरा दिला जाऊ शकतो. तळाला स्पिकर ग्रिल, सिम ट्रे आणि USB Type-C पोर्ट देण्यात येईल. तर डाव्या पॅनलवर पावर बटण असेल. सिक्योरिटीसाठी या स्मार्टफोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर दिला जाईल.   

टेना लिस्टिंगनुसार, Samsung Galaxy S21 FE मध्ये 6.4-इंचाचा अ‍ॅमोलेड डिस्प्ले असू शकतो. हा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. लिस्टिंगमधून 4,370 mAh च्या बॅटरीची माहिती समोर आली आहे. अलीकडेच समोर आलेल्या FCC आणि 3C सर्टिफिकेशनच्या लिस्टिंगनुसार फोनमध्ये क्रमशः 45 वॉट आणि 25 वॉट फास्ट चार्जिंग असू शकते. गीकबेंचवर Samsung Galaxy S21 FE स्नॅपड्रॅगन 888 SoC प्रोसेसर आणि 8GB रॅमसह लिस्ट झाला होता.   

Web Title: Samsung galaxy s21 fe 5g listed on german website with qualcomm snapdragon 888 soc  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.