Samsung Galaxy S21 FE: कमी किंमतीत फ्लॅगशिप फिचर; सॅमसंग वनप्लसला धोबीपछाड देण्यासाठी सज्ज
By सिद्धेश जाधव | Published: January 4, 2022 12:13 PM2022-01-04T12:13:00+5:302022-01-04T12:13:15+5:30
Samsung Galaxy S21 FE: बहुप्रतीक्षित Samsung Galaxy S21 FE स्मार्टफोन लाँच झाला आहे. हा फोन 120Hz रिफ्रेश रेट, Snapdragon 888 प्रोसेसर, 12MP ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप, 32MP सेल्फी कॅमेरा आणि 4,5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.
Samsung चा बहुप्रतीक्षित Samsung Galaxy S21 FE स्मार्टफोन लाँच झाला आहे. कंपनीनं फ्लॅगशिप स्पेक्स कमी किंमतीत देण्याचा प्रयत्न केला आहे. हा फोन 120Hz रिफ्रेश रेट, Snapdragon 888 प्रोसेसर, 12MP ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप, 32MP सेल्फी कॅमेरा आणि 4,5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. चला जाणून घेऊया या फोनच्या स्पेक्स आणि किंमतीची माहिती जाणून घेऊया.
Samsung Galaxy S21 FE चे स्पेसिफिकेशन्स
Samsung Galaxy S21 FE स्मार्टफोनमध्ये 6.4-इंचाचा फुल एचडी+ डायनॅमिक अॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. हा पंच होल डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. वेगवेगळ्या देशांत सॅमसंगचा हा स्मार्टफोन Snapdragon 888 किंवा Exynos 2100 प्रोसेसरसह सादर केला जाईल. कंपनीनं यात 8GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंतची स्टोरेज दिली आहे. Samsung चा हा फ्लॅगशिप स्मार्टफोन Android 12 वर आधारित One UI 4.0 वर चालतो.
Galaxy S21 FE मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात 12MP चा चा अल्ट्रा वाईड प्रायमरी कॅमेरा, 12MP ची सेकंडरी लेन्स आणि 8MP चा टेलीफोटो सेन्सर मिळतो. सॅमसंगच्या या फोनमध्ये 32MP चा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. बेसिक कनेक्टिव्हिटीसह येणारा हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरला सपोर्ट करतो. तसेच यात फोन स्टीरियो स्पिकर आणि IP68 रेटिंग देण्यात आली आहे.पॉवर बॅकअपसाठी यात 4,500mAh ची बॅटरी 25W फास्ट चार्जिंगसह देण्यात आली आहे.
Samsung Galaxy S21 FE ची किंमत
Samsung Galaxy S21 FE स्मार्टफोन व्हाईट, लेवंडर, ग्रॅफाइट आणि ऑलिव्ह अशा चार रंगात विकत घेता येईल. Galaxy S21 FE स्मार्टफोनचे दोन व्हेरिएंट सादर करण्यात आले आहेत. फोनचा 6GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज असलेला मॉडेल 699 डॉलर (सुमारे 52,000 रुपये) मध्ये सादर करण्यात आला आहे. तर 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज मॉडेलसाठी 749 डॉलर (करीब 55,800 रुपये) मोजावे लागतील. भारतात लवकरच Galaxy S21 FE स्मार्टफोन सादर केला जाऊ शकतो.
हे देखील वाचा:
न्यू ईयर गिफ्ट! व्हॉट्सॲपवर यंदा मिळणार भन्नाट फीचर्स