भारतीयांच्या वाट्याला पुन्हा निराशा; Exynos प्रोसेसरसह येणार Samsung Galaxy S21 FE स्मार्टफोन 

By सिद्धेश जाधव | Published: January 1, 2022 05:31 PM2022-01-01T17:31:27+5:302022-01-01T17:32:00+5:30

Samsung Galaxy S21 FE: Samsung Galaxy S21 FE स्मार्टफोन भारतात Exynos 2100 प्रोसेसरसह सादर केला जाईल. तर ग्लोबल मार्केटमध्ये हा फोन Snapdragon 888 चिपसेटसह सादर केला जाईल.

Samsung galaxy s21 fe may launch in india with exynos 2100 processor  | भारतीयांच्या वाट्याला पुन्हा निराशा; Exynos प्रोसेसरसह येणार Samsung Galaxy S21 FE स्मार्टफोन 

भारतीयांच्या वाट्याला पुन्हा निराशा; Exynos प्रोसेसरसह येणार Samsung Galaxy S21 FE स्मार्टफोन 

Next

Samsung Galaxy S21 FE स्मार्टफोन CES 2022 इव्हेंटमध्ये 4 जानेवारीला लाँच केला जाईल, अशी बातमी काही दिवसांपूर्वी आली आहे. कंपनीची नवीन फ्लॅगशिप सीरिज बाजारात येण्याआधी हा स्मार्टफोन ग्राहकांच्या भेटीला येईल. आता 91mobiles नं दिलेल्या बातमीमुळे सॅमसंगच्या भारतीय फॅन्सच्या वाटेल पुन्हा निराशा आली आहे. सॅमसंगचा हा फोन भारतात Exynos 2100 वचिपसेटसह सादर केला जाईल. 

Samsung Galaxy S21 FE स्मार्टफोन भारतात Exynos 2100 प्रोसेसरसह सादर केला जाईल. तर ग्लोबल मार्केटमध्ये हा फोन Snapdragon 888 चिपसेटसह सादर केला जाईल. Exynos सॅमसंगचाचा प्रोसेसर आहे, जो क्वॉलकॉमच्या तुलनेत चांगला परफॉर्म करत नाही. सॅमसंगचा आगामी फोन भारतात 8GB RAM आणि 128GB 256GB स्टोरेजसह सादर जानेवारी मध्ये लाँच केला जाईल. 

Samsung Galaxy S21 FE चे स्पेसिफिकेशन्स 

Samsung Galaxy S21 FE स्मार्टफोनमध्ये 6.4-इंचाचा फुलएचडी+ अ‍ॅमोलेड डिस्प्ले दिला जाईल. हा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट आणि 2340 x 1080 पिक्सल रिजोल्यूशनसह बाजारात येईल. हा पंच होल डिस्प्ले Corning Gorilla Glass प्रोटेक्शनला सपोर्ट करेल.  

Galaxy S21 FE स्मार्टफोनमध्ये मार्केटनुसार Qualcomm Snapdragon 888 आणि Exynos 2100 5G प्रोसेसर मिळेल. हा फोन Android 11 ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित OneUI 3.1 वर चालेल. सोबत 8GB पर्यंत रॅम आणि 128GB स्टोरेज मिळू शकते. कनेक्टिव्हिटीसाठी यात 5G, 4G LTE, ड्युअल-बँड Wi-Fi, Bluetooth 5.2, GPS, NFC, आणि USB Type-C पोर्ट दिला जाईल. 

Samsung Galaxy S21 FE स्मार्टफोनच्या बॅक पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. ज्यात 12MP चा प्रायमरी कॅमेरा, 12MP चा अल्ट्रा वाईड अँगल कॅमेरा आणि 8MP टेलीफोटो सेन्सर मिळेल. फोनमध्ये 32MP चा फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो. या फोनमध्ये 4,500mAh बॅटरी 25W फास्ट चार्जिंगसह देण्यात येईल, जी वायरलेस आणि रिवर्स चार्जिंगला सपोर्ट करेल.  

Web Title: Samsung galaxy s21 fe may launch in india with exynos 2100 processor 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.