29 ऑक्टोबरला येणार Samsung Galaxy S21 FE स्मार्टफोन, या दिवशी सुरु होणार प्री-बुकिंग
By सिद्धेश जाधव | Published: September 3, 2021 07:40 PM2021-09-03T19:40:19+5:302021-09-03T19:40:53+5:30
Samsung Galaxy S21 FE Launch: प्रसिद्ध टिपस्टर Jon Prosser ने Samsung Galaxy S21 FE ची लाँच टाइमलाईन समोर ठेवली आहे. या लीकनुसार सॅमसंग पुढील महिन्यात 29 तारखेला गॅलेक्सी एस21 एफई स्मार्टफोन मंचावर सादर करेल.
Samsung Galaxy S21 FE स्मार्टफोन फक्त लिक्स आणि रिपोर्ट्समधून समोर येत आहे. परंतु या स्मार्टफोनच्या लाँचची तारीख मात्र अजून समोर आली नाही. हा स्मार्टफोन गेल्या महिन्यात फोल्डेबल स्मार्टफोन्स सोबत लाँच होणार होता. कंपनीने देखील या स्मार्टफोनच्या लाँचची निश्चित तारीख सांगितली नाही. परंतु आता एका नव्या लीकमध्ये Samsung Galaxy S21 FE 29 ऑक्टोबरला लाँच केला जाईल, असा दावा करण्यात आला आहे.
प्रसिद्ध टिपस्टर Jon Prosser ने Samsung Galaxy S21 FE ची लाँच टाइमलाईन समोर ठेवली आहे. या लीकनुसार सॅमसंग पुढील महिन्यात 29 तारखेला गॅलेक्सी एस21 एफई स्मार्टफोन मंचावर सादर करेल. तसेच लाँचच्या आधी 20 ऑक्टोबरला हा फोन प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध होईल. ही जागतिक लाँचची तारीख आहे, अशा आहे कि जागतिक लाँचनंतर हा फोन भारतीय बाजारात देखील उपलब्ध होईल.
Samsung Galaxy S21 FE चे स्पेसिफिकेशन्स
MyFixGuide ने दिलेल्या माहितीनुसार Samsung Galaxy S21 FE स्मार्टफोनमध्ये फुल एचडी+ डिस्प्ले देण्यात येईल. हा डिस्प्ले पंच होल डिजाईनसह सादर केला जाईल. प्रोसेसिंगच्या बाबतीत या स्मार्टफोनचे फ्लॅगशिप स्टेटस दिसून येते. Galaxy S21 FE मध्ये Qualcomm Snapdragon 888 SoC देण्यात येईल. तसेच फोनमध्ये 6GB RAM आणि Adreno 660 GPU मिळू शकतो.
Samsung Galaxy S21 FE च्या बॅक पॅनलवर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळू शकतो. याआधी आलेल्या रिपोर्ट्सनुसार या स्मार्टफोनमध्ये 12MP चा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आणि 32MP सेल्फी कॅमेरा दिला जाऊ शकतो. तळाला स्पिकर ग्रिल, सिम ट्रे आणि USB Type-C पोर्ट देण्यात येईल. तर डाव्या पॅनलवर पावर बटण असेल. सिक्योरिटीसाठी या स्मार्टफोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर दिला जाईल.
टेना लिस्टिंगनुसार, Samsung Galaxy S21 FE मध्ये 6.4-इंचाचा अॅमोलेड डिस्प्ले असू शकतो. हा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. लिस्टिंगमधून 4,370 mAh च्या बॅटरीची माहिती समोर आली आहे. अलीकडेच समोर आलेल्या FCC आणि 3C सर्टिफिकेशनच्या लिस्टिंगनुसार फोनमध्ये क्रमशः 45 वॉट आणि 25 वॉट फास्ट चार्जिंग असू शकते. गीकबेंचवर Samsung Galaxy S21 FE स्नॅपड्रॅगन 888 SoC प्रोसेसर आणि 8GB रॅमसह लिस्ट झाला होता.