Samsung ने केली मोठी चूक; लाँचपूर्वीच आगामी Galaxy S21 FE चा फोटो इंस्टग्रामवर शेयर  

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2021 01:01 PM2021-08-11T13:01:07+5:302021-08-11T13:01:44+5:30

Galaxy S21 FE Image Leak: सॅमसंगने चुकून आपल्या Instagram अकॉउंटवर Galaxy S21 FE चा फोटो शेयर केला आहे.  

Samsung Galaxy S21 FE official image on instagram  | Samsung ने केली मोठी चूक; लाँचपूर्वीच आगामी Galaxy S21 FE चा फोटो इंस्टग्रामवर शेयर  

Samsung ने केली मोठी चूक; लाँचपूर्वीच आगामी Galaxy S21 FE चा फोटो इंस्टग्रामवर शेयर  

Next
ठळक मुद्देसॅमसंगने चुकून आपल्या Instagram अकॉउंटवर Galaxy S21 FE चा फोटो शेयर केला आहे.  

सॅमसंगच्या फ्लॅगशिप Galaxy S21 सीरिजमधील किफायतशीर Galaxy S21 FE ची वाट कंपनीच्या चाहत्यांसह टेक इंडस्ट्री देखील बघत आहेत. आता पर्यंत या स्मार्टफोनचे अनेक लीक आले आहेत, परंतु या लिक्स आणि बातम्यांमध्ये साम्य आढळत नाही. काही दिवसांपूर्वी बातमी आली होती कि हा स्मार्टफोन 11 ऑगस्ट रोजी Galaxy Unpacked इव्हेंटमध्ये सादर केला जाईल, तर काही रिपोर्ट्स हा फोन ऑक्टोबरमध्ये येणार असल्याचे सांगतात. दरम्यान आता नवीन बातमी आली आहे कि सॅमसंगने चुकून आपल्या Instagram अकॉउंटवर Galaxy S21 FE चा फोटो शेयर केला आहे.  

टेक वेबसाईट सॅममोबाईल्सने सॅमसंगच्या इंस्टाग्राम पोस्टचा एक स्क्रिनशॉट शेयर केला आहे. या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये एक नवीन सॅमसंग फोन दिसत आहे. हा स्मार्टफोन Samsung Galaxy S21 FE आहे, अशी चर्चा आहे. कंपनीने आपल्या इंस्टाग्राम अकॉउंटवरून ही पोस्ट त्वरित काढून टाकली. पोस्ट डिलीट केल्यामुळे गॅलेक्सी एफ21 एफई स्मार्टफोनच्या लाँचच्या बातम्यांना उधाण आले आहे.  

Samsung Galaxy S21 FE चे स्पेसिफिकेशन्स 

आतापर्यंत आलेल्या लीक्स आणि लिस्टिंगनुसार, Samsung Galaxy S21 FE मध्ये 6.4-इंचाचा अ‍ॅमोलेड डिस्प्ले दिला जाऊ शकतो. हा डिस्प्ले पंच होलसह 120हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करू शकतो. या स्मार्टफोनमध्ये 12MP चा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आणि 32MP सेल्फी कॅमेरा दिला जाऊ शकतो. हा सॅमसंग स्मार्टफोन अँड्रॉइड 11 आधारित One UI 3.1.1 वर चालेल. तसेच या फोनमध्ये 8GB रॅम आणि 256GB इंटरनल स्टोरेज मिळू शकते. 

Galaxy Unpacked 2021 

आज 11 ऑगस्ट रोजी Samsung ने यावर्षीच्या सर्वात मोठ्या इव्हेंटचे आयोजन केले आहे. या Galaxy Unpacked 2021 इव्हेंटच्या माध्यमातून कंपनीने आपले स्मार्टफोन आणि स्मार्ट गॅजेट्स लाँच करणार आहे. सॅमसंगचा हा इव्हेंट आज भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता सुरु होईल. या इव्हेंटचे थेट प्रक्षेपण सॅमसंगच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंट, सॅमसंग वेबसाईट आणि युट्युब चॅनेलवरून करण्यात येईल.  

Web Title: Samsung Galaxy S21 FE official image on instagram 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.